Chitra Kishor Wagh Saam Tv
महाराष्ट्र

मेहबुब शेख प्रकरणात पीडितेचा नवा आरोप; चित्रा वाघ, सुरेश धसांची घेतली नावे

काही महिन्यापूर्वी पीडितेने तक्रार दाखल केली होती.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) मेहबुब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते, या प्रकरणात आता पीडितेने नवा खुलासा केला आहे. याप्रकरणी आता भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे. वाघ यांच्यावर या अगोदरही असा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळणं घेतले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने नवीन खुलासा केला असून, भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याच पीडित तरुणीने आरोप केला आहे. याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. ज्यात एफआयरमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि मालेगाव येथील माजी नगरसेवक नदमोद्दीन शेख यांची नावे आहेत.

मेहबुब शेख यांच्यावर काय आरोप होते?

एका तरुणीला मेहबुब शेख यांनी नोकरीचे आमिष दाखवून गाडीत अत्याचार केल्याचा आरोप त्या तरुणीने केला होता. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार काही महिन्यापूर्वी केली होती. आता या प्रकरणाला नवे वळणं लागले आहे.

या प्रकरणी आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. 'राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पीडितेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केली आहे, हे आताचं माध्यमातून कळल ज्या केसेसमध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे. आम्ही त्या मुलीला मदत केली आहे. आम्ही चौकशीला जायला तयार आहे. असे अनुभव येत असतात तरीही आम्ही घाबरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT