NPPA CAPS PRICES OF 30 ESSENTIAL MEDICINES | BIG RELIEF FOR DIABETES, BP AND HEART PATIENTS Saam Tv
महाराष्ट्र

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Medicine Price Control News : राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने डायबिटीस, बीपी, हृदयविकार आणि इतर ३० अत्यावश्यक औषधांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. या निर्णयामुळे लाखो रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी

  • केंद्र सरकारने ३० अत्यावश्यक औषधांच्या किंमती निश्चित केल्या

  • डायबिटीस, बीपी, हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलवरील औषधे आता नियंत्रित दरात मिळणार

  • दिलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत असताना केंद्र सरकारने लाखो रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) डायबिटीज, बीपी, हार्टअटॅकसह इतर ३० औषधांच्या किंमती निश्चित केल्या असून त्या स्वस्त दरात विकण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण येणार असून रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.

देशात एकाच औषधाचे विविध ब्रँड आणि वेगवेगळ्या किमतींमुळे रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. अनेकदा एकाच औषधासाठी वेगवेगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात किंमतीत फरक दिसून येत होता. मात्र आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची आर्थिक लूट थांबण्यासाठी ३० गोळ्यांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. औषध उत्पादक कंपन्या आणि औषध विक्रेते निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा अधिक दर आकारू शकणार नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सध्याचा औषधांचा साठा संपल्यानंतर नवीन दर लागू केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डायबिटीज,हार्टअटॅक, बीपी, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन डी-3, कॅल्शियम सप्लिमेंट्स, अ‍ॅलर्जी आणि दम्यावरील औषधे; तसेच सर्जरीनंतर वापरल्या जाणाऱ्या महागड्या टॅक्रोलिमस कॅप्सूलच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे मोठं मोठ्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांचा औषध खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी औषध खरेदी करताना त्यावरील एमआरपी तपासावी आणि अधिक किंमत आकारल्यास एनपीपीए किंवा संबंधित औषध नियंत्रण विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT