हृदयद्रावक! औषधाची गोळी खाताना ठसका लागल्याने तरुणाचा मृत्यू
हृदयद्रावक! औषधाची गोळी खाताना ठसका लागल्याने तरुणाचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! औषधाची गोळी खाताना ठसका लागल्याने तरुणाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर - वाढदिवसाला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढदिवसा दिवशीच त्याच्या कुटुंबीयांवर रक्षाविसर्जन करण्याची वेळ आली आहे. प्रतीक प्रकाश गुरव असे या मृत पावलेल्या 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत प्रतीकला गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता.

हे देखील पहा -

यावर औषधोपचार देखील सुरू होता. दरम्यान गुरुवारी प्रतीक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी आला होता. यानंतर त्याने औषधाची गोळी घेतली पण गोळी तोंडात टाकताच त्याला जोराचा ठसका लागला आणि गोळी प्रतीकच्या श्वसननलिकेत जाऊन अडकली. यामुळे प्रतीकला गुदमरल्यासारखे वाटू लागले.

यानंतर वडिलांनी त्वरित प्रतीकला गावातील रुग्णालयात दाखल केले. पण गावातील डॉक्टरांनी प्रतीकला तातडीने कोल्हापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. पण तोपर्यंत त्याची प्रकृती आणखी बिघडली. कोल्हापुरात गेल्यानंतर उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ठसका लागल्याने गोळी श्वसननलिकेत अडकली आणि श्वास घ्यायला त्रास झाल्याने हृदयावर ताण येऊन प्रतीकचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weightloss Tips: झटपट वजन होईल कमी; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Utkarasha Rupvate Car Attack | वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या गाडीवर दगडफेक

Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT