Utkarasha Rupvate Car Attack | वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या गाडीवर दगडफेक

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्याच्या चीतळवेढे गावाजवळ ही घटना घडली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्याच्या चीतळवेढे गावाजवळ ही घटना घडली आहे. प्रचार संपवून रुपवते या संगमनेरकडे जात होत्या. तेव्हा रात्री १२ च्या सुमारात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पण त्यात रुपवते यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com