बहिणीच्या मैत्रीणीवर अत्याचार करुन मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला
बहिणीच्या मैत्रीणीवर अत्याचार करुन मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ
बहिणीच्या मैत्रीणीवर अत्याचार करुन मारहाण; यवतमाळमध्ये खळबळसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - शहरात गेल्या नऊ दिवसांपासून आदिशक्तीचा जागर सुरु होता. अशा भक्तिमय वातावरणातच एका नराधमाने स्वतःच्या बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केला यावरच न थांबता या नराधमाने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जीवघेणी मारहाण केली त्यानंतर तीला घरी आणून सोडून दिले. शनिवारी सकाळी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा -

अक्षय  बगमारे ऊर्फ बागा असे या नराधमाचे नाव आहे. पिडीतेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. संपूर्ण शहर आई जगदंबेच्या आराधनेत लीन असतानाच हा प्रकार घडला. अवधूतवाडी पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून अक्षय याच्यावर ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपो पसार असून अवधूतवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बहिणीच्या मैत्रीणीवर अत्याचार करुन मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

आरोपी पीडित मुलीला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर आरोपीच्या साथीदारांनी पीडित मुलीवर अत्याचार केला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर ऑटोत बसून घरी सोडून दिले. ड्युटीवरून परत आल्यावर वडिलांना हा सर्व प्रकार दिसला. भीतीपोटी ती काहीच बोलायला तयार नव्हती.  अखेर तिच्या वडिलाने पोलीसात नातेवाइकाच्या मदतीने तक्रार दिली आणि पोलीसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com