D कंपनीचा माणूस असल्याचे सांगत मेडिकलची तोडफोड; नागरिकांनी बेदम चोपला! सागर गायकवाड
महाराष्ट्र

D कंपनीचा माणूस असल्याचे सांगत मेडिकलची तोडफोड; नागरिकांनी बेदम चोपला!

D कंपनीचा माणूस असल्याचे सांगत मेडिकलची तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने वार करत एका इसमाला जखमी करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांसमोरच बेदम चोप दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक : D कंपनीचा (D Company) माणूस असल्याचे सांगत मेडिकलची तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने वार करत एका इसमाला जखमी करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांसमोरच बेदम चोप दिला आहे. जगदीश गांगुर्डे असे गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे देखील पहा-

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नाशिकच्या सिडको, कामटवाडे परिसरात एका मेडिकल मध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास  " मी जगदीश गांगुर्डे " यांचा माणूस असून 20 लाख रुपयांची खंडणी मागत गोंधळ घातला.

त्यानंतर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, या तरुणाने त्यांच्यावरच चाकुने हल्ला चढवत जखमी केले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र तरी देखील पोलिसंसमोर या तरुणाने मोठा गोंधळ घालत स्वतःला डी कंपनीचा माणूस असल्याचे बतावत नागरिकांना धमकावले.

त्यातच यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी पोलिसांसमोरच तरुणाला चांगला चोप दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत या तरुणाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात Ambad Police Station संशयित जगदीश गांगुर्डे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Om chanting benefits: दररोज 21 दिवस ‘ॐ’चा जप केल्याने काय बदल घडतात?

भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

SCROLL FOR NEXT