Explosive Honey Trap Twist Saam Tv News
महाराष्ट्र

Honey Trap: न्यूड फोटो, जाळ्यात अडकवण्यासाठी शरीरसंबंध अन्.. हनी ट्रॅप म्हणजे काय रे भाऊ? कसे अडकले जातात?

Nashik Honey Trap: नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ७२ अधिकारी आणि माजी मंत्र्यांच्या अडकण्याची माहिती समोर आली असून चौकशीला वेग आला आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात पावासाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला. नाशिकमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात ७२ हून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी मंत्री अडकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यात हनी ट्रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे. हनी ट्रॅपचा वापर साधारण देशातील संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून सुरक्षेची माहिती मिळवण्यासाठी केला जातो. मात्र, अनेकांना हनी ट्रॅप म्हणजे काय आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं केला जातो? याची पुरेशी माहिती नसते. चला तर मग साध्या शब्दात हनी ट्रॅप म्हणजे काय? जाणून घेऊयात.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या स्त्रीला मोहात पाडून त्यांच्याकडून गोपनीय माहितीकाडून घेणे होय. ही माहिती देशाच्या सुरक्षेसाठी किंवा महत्वाच्या घडामोडींविषयी असते. यालाच हनी ट्रॅप असे म्हणतात. या प्रकाराला काही ठिकाणी हनी पॉट देखील म्हटले जाते. सुरक्षा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती अथवा महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना यात अडकवले जाते.

कालांतराने हनी ट्रॅपचे स्वरूप बदलत गेले. राजकारण असो किंवा कॉर्पेरेट कार्यालय, विविध क्षेत्रातून आजकाल हनी ट्र्रॅपचे प्रकार समोर येत आहेत. महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना आधी सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलेजाते. नंतर त्यांच्याकडून महत्वाची माहिती काढून घेतली जाते. किंवा लाखो कोट्यवधी रूपये लुबाडले जाते.

हनी ट्रॅप करणारी व्यक्ती सर्वात आधी टार्गेट व्यक्तीकडे जाते. शरीरसुखाची ऑफर देतात. नंतर समोरच्या व्यक्तींचा विश्वास संपादित करतात. त्यानंतर जाळ्यात ओढून त्यांच्याकडून महत्वाची माहिती काढून घेतात. तसेच गुपितेही काढून घेतात. मात्र, काळानुसार, हनी ट्रॅपचे स्वरूप बदलले आहे. जर, एखाद्या व्यक्तीला अडवायचं असेल, तर सोशल मीडियाचा वापर केला जातो.

विविध अॅपच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात फसवलं जातं. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि चॅटद्वारे टार्गेट व्यक्तीशी जवळीक साधली जाते. विश्वास संपादित केला जातो. काहीवेळेस न्यूड फोटोही पाठवले जाते. नंतर ब्लॅकमेल करून पैसे उकाळले जाते.

सध्या राज्याच्या राजकारणातही नाशिकमधील हनी ट्रॅपचा मुद्दा केंद्रबिंदू ठरत आहे. तपासातून हळूहळू माहिती उघडकीस होत आहे. सध्या या प्रकरणामुळे हनी ट्रॅप हा मुद्दा पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

Sawan Budhwar Upay : श्रावणातील बुधवारी करा 'हे' सोपे उपाय; गणपती बाप्पा सोबत शंकराचाही मिळेळ आशीर्वाद

Kasara : कसारा स्थानकात लोकलवर दरड कोसळली, 2 प्रवासी गंभीर जखमी | VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! निवडणुकांनंतर अर्जांची पडताळणी होणार

SCROLL FOR NEXT