Sunil Shelke Saam tv
महाराष्ट्र

Sunil Shelke : बदनामी करू नका, नाही तर दिवाळीनंतर फटाके वाजवण्यास तयार; आमदार शेळके यांची विरोधकांवर जोरदार टिका

Maval News : पुढाऱ्यांना आम्ही दिलेल्या उमेदवाराला विरोध केला. तुम्हाला जर यात माती कालवायची असेल तर नक्कीच कालवा; अशा शब्दात जोरदार टीका आमदार शेळके यांनी विरोधकावर केली.

दिलीप कांबळे

मावळ : मावळचा सर्वांगीण विकास बघायचा असेल तर टुकार आणि एजंटांचे म्हणणे ऐकू नका. आमची बदनामी करू नका. दहा महिने झाले गप्प आहे. बाळा भेगडेंनी शासकीय निधी कुठे, कशासाठी व कुणासाठी वापरला. मावळात तुमच्या काळात जिथे फंड आला तिथे कामेच झाले नाही. कोणत्या समाजाच्या जमिनी कोणाच्या नावावर केल्या; हे सर्व माहिती आहे. मात्र ते बोलून दाखवत नाही. आमची बदनामी करू नका; नाही तर दिवाळीनंतर मीही फटाके वाजवण्यास तयार आहे; अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळच्या वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकावर जोरदार टिका केली. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जाण्यासाठी तयार आहे. या मेळाव्याला तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

आम्ही दिलेल्या भाजपच्या उमेदवारालाही विरोध 

आमच्याकडे उमेदवार असूनही महायुती भाजपचा कार्यकर्ता संतोष दाभाडे यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नगराध्यक्ष म्हणून नाव राष्ट्रवादीने घोषित केले. तळेगाव दाभाडे येथील सर्वे करत असताना ७५ टक्के मतदार आमच्या बाजूला असूनही आम्ही मोठेपणाने भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय दिला. मात्र येथील पुढाऱ्यांना आम्ही दिलेल्या उमेदवाराला विरोध केला. तुम्हाला जर यात माती कालवायची असेल तर नक्कीच कालवा; अशा शब्दात जोरदार टीका आमदार शेळके यांनी विरोधकावर केली. 

भाजपचे नेते रवींद्र भेगडे यांचे तिकीट कोणी कापले
मावळ विधानसभेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. तुम्हाला सुनील शेळके चालत नसेल, तर कमळ चिन्ह घेऊन दुसरा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ असं मला सांगितल्यानंतर होकार दिला. त्या मीटिंगमध्ये बावनकुळे यांनी भाजपचे कार्यकर्ते रवींद्र भेगडे यांची उमेदवारी जाहीर केली. पुण्यात जाऊन एबी फॉर्म घ्या, असे ठणकावून बाळा भेगडे यांना सांगितले. मात्र रवी भेगडेला थांबून यांनी अपक्षांची साथ दिली. आत्ता स्वराज्य संस्थेची निवडणूक बघून तुम्हाला कमळाची आठवण का झाली? असा सवाल आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना केला.

पैसे घेऊन मतदान करतात हा गैरसमज 
मावळतील जनता पैसे घेऊन मतदान करतात, हा गैरसमज मनातून काढून टाका. सध्या मावळात महिलाना देवदर्शनला घेऊन जाणे, खेळ रंगला पैठणीचा. नागरिकांना फुल एन्जॉय करा. पण पाच वर्ष कोण तुमच्या मागे राहतात त्याचा विचार करा आणि त्यालाच मतदान करा. महिलांचे आरक्षण पडलं मला फारच आनंद झाला. ज्या आया बहिणींनी मला आमदार केलं आज त्यांचा विजय झाला. मात्र उमेदवारांची परीक्षा घेऊनच सुकाणू कमिटी पुढील निर्णय देणार आहे. असे म्हणत उमेदवार आणि नागरिक या दोघांचेही कान आमदार सुनील शेळके टोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर, कधी, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT