Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : देहू- देवफाटा रस्ता मृत्यूचा सापळा; एकाच दिवशी झाले नऊ अपघात, ग्रामस्थांचे उपोषण

Maval News : खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली असताना देखील रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे

दिलीप कांबळे

मावळ : श्रीक्षेत्र देहू ते देवफाटा या महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था थेट जीवघेणी ठरत आहे. रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या रस्त्यावर एकाच दिवशी तब्बल नऊ अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी येलवाडी येथील ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक आळंदी, देहू व भंडारा डोंगराकडे या रस्त्याने जातात. नेहमी रहदारी असलेल्या या रस्त्यावर रोजच लहान- मोठे अपघात होत असल्याची नोंद झाली आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे भाविकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. यातच एकाच दिवसात नऊ अपघात झाले आहेत. तर आतापर्यंत शेकडो विद्यार्थी, दूधवाले आणि नागरिक अपघातांमध्ये जखमी झाले आहेत.

अनेकदा दिले निवेदन 

रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असते. वारंवार होणारे अपघात लक्षात घेता रस्ते विकास महामंडळाला परिसरातील नागरिकांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अजूनही दखल घेतली नसल्याने वाहन धारकांचा त्रास कमी झालेला नाही. यामुळे ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत आले आहेत. 

ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण 
प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर येलवाडी ग्रामस्थांनी संतापून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आता तरी प्रशासन जागे होईल का? की अजून किती बळी घेतल्यावर रस्ता दुरुस्त होणार? असा सवाल उपस्थित करत रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल; असा इशारा देण्यात आला असून प्रत्येक अपघाताची जबाबदारी शासनावर राहील; असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death : लोकप्रिय गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, स्कूबा डायव्हिंग करताना अपघातात गमावला जीव

Vanraj Andekar: आंदेकरच्या अडचणीत वाढ, कुटुंबाविरोधात दुसरा गुन्हा; जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, बँक अकाउंट सील

Lonar Lake : लोणार सरोवराच्या पाणी पातळीत प्रथमच वाढ; सरोवरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली

Healthy Sleep: जास्त झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या परिणाम कोणते?

Mumbai Railway : रेल्वेचा मोठा निर्णय! पालघर जिल्ह्यात ७ नवीन रेल्वे स्टेशन उभारणार, गेमचेंजर प्रकल्प कधी पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT