Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : मित्रांसोबत फिरायला गेले असता घडले दुर्दैवी; कुंडमळ्यात दोघे बुडाले

Maval News : श्रेया व रोहन यांच्यासह सात ते आठ मित्र मावळातील कुंडमळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान हे सर्वजण कुंडमळ्याच्या पाण्यात उतरले होते. त्यातील श्रेया व रोहन याना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे वाहून गेले

दिलीप कांबळे

मावळ : मावळमधील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा परिसरात मित्र मित्र फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांमधील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एमआयडीसी तळेगाव पोलीस तसेच शोधकार्यासाठी वन्यजीव रक्षक टीम दाखल झाली आहे. 

चिंचवड गाव येथील श्रेया सुरेश गावडे (वय १७) आणि रोहन ज्ञानेशवर ढोंबरे (वय २२) असे वाहून गेलेल्या तरुण तरुणीचे नाव आहे. श्रेया व रोहन यांच्यासह सात ते आठ मित्र मावळातील कुंडमळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. (Maval) दरम्यान हे सर्वजण कुंडमळ्याच्या पाण्यात उतरले होते. त्यातील श्रेया व रोहन याना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे वाहून गेले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी सर्व मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथक घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केलं आहे. एकीकडे प्रशासनाने (Indrayani River) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली असताना ही पर्यटक अश्या पध्दतीने आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

SCROLL FOR NEXT