Maval News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : जमिनीची मोजणी करताना जमावाकडून सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; २ जण जखमी

दिलीप कांबळे

मावळ : मालमत्तेची मोजणी करण्याचे प्रकरण आल्यानंतर त्याची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील रोहित जाधव हे भू मापक आणि त्यांच्या सहाय्यक गेले होते. मोजणी सुरु असताना त्यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मावळच्या गोडुंबरे या गावात मोजणीचे काम करत असताना हा प्रकार घडला.

मावळ (Maval) तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील भू मापक रोहित पाटील व सहाय्यक एका मालमत्तेची मोजणी करण्यासाठी गोडुंबरे येथे गेले होते. तेथे अर्जदाराने दाखविलेल्या जागेचा पंचनामा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याचवेळी १० ते १५ लोकांच्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक करून कामात अडथळे आणले. तसेच त्यांना लाठ्या- काठ्यांनी मारहाण केली. यात जाधव व त्यांचे सहकारी जखमी झाले आहेत. 

दरम्यान सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जाधव यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात जमावाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने केली आहे. तर या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने भूमिअभिलेख अधिकारी वर्गाला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या हरियाणा दौऱ्यावर

Shyam Manav: श्याम मानव यांच्या व्याख्यानात राडा; कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांचा गोंधळ, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: आचारसंहिता लागू झाल्यावर निधी दिला का? आम्ही तपास करू; लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचं मोठं वक्तव्य

Raigad : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

SCROLL FOR NEXT