Indrayani River: 2 Brothers Dead  Saam Tv
महाराष्ट्र

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

2 Brother Died In Indrayani River: मावळ तालुक्यातील कुंडमळा इथून इंद्रायणी नदी वाहते. या नदीमध्ये पोहण्यासाठी दोन तरुण आले होते. नदीपात्रामध्ये ते पोहण्यासाठी उतरले खरे पण त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

इंद्रायणी नदीमध्ये (Indrayani River) बुडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यामध्ये कुंडमळा येथे ही घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही भावांचा बुडून मृत्यू झाला. बऱ्याच तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील कुंडमळा इथून इंद्रायणी नदी वाहते. या नदीमध्ये पोहण्यासाठी दोन तरुण आले होते. नदीपात्रामध्ये ते पोहण्यासाठी उतरले खरे पण त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे दमछाक होऊन या दोन्ही तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या तरुणांना नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र मावळ, आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा या पथकाला पाचारण केले. काही वेळात या दोघांचे मृतदेह रेस्क्यू टीमने नदीपात्राबाहेर काढले. या प्रकरणाचा पुढील तपास आंबी एमआयडीसी पोलिस करत आहे.

साजीद बागवान आणि आतीक बागवान अशी या दोन्ही मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघेही चुलत भावंड होती. दोघेही पिंपरी-चिंचवडच्या निगडी येथून कुंडमळ्यावर पोहण्यासाठी आले होते. आंबी एमआयडीसी पोलिसांनी याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT