tree cutting saam tv
महाराष्ट्र

Tree Cutting: मावळमध्ये झाडे लावा, झाडे जगवा नाही, तर झाडे तोडा अभियान 40 ते 50 झाडांची विनापरवाना कत्तल

झाडे लावा झाडे जगवा, हा नारा सर्वत्र लोकप्रिय आहे. परंतु, मावळ तालुक्यात लावलेली झाडे तोडा असा काहीसा प्रकार सुरु आहे.

दिलीप कांबळे

मावळ: झाडे लावा झाडे जगवा, हा नारा सर्वत्र लोकप्रिय आहे. परंतु, मावळ तालुक्यात लावलेली झाडे तोडा असा काहीसा प्रकार सुरु आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चाळीस ते पन्नास झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विकासकामांच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली आहे (Maval 40-50 Tree cutting in Talegaon Dabhade without permission).

नेमकं प्रकरण काय?

मावळमधील (Maval) तळेगाव दाभाडे येथील उमंग सोसायटीजवळ एक नैसर्गिक ओढा होता. तो नैसर्गिक ओढा ग्रीन बेल्ट झोनमध्ये असून त्या ओढ्याच्या आजूबाजूला काही बांधकामे झाली आहेत आणि रहिवासी इमारती झाल्या आहेत. त्या सर्व इमारतींचे सांडपाणी आणि मैला त्या ओढ्यातून सोडण्याचा प्रयत्न नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत होता. त्या ओढ्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्ष (Trees) जोपासले गेले होते आणि तेथे वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते.

त्यामुळे या ओढ्यामध्ये सांडपाणी जाण्याचा मार्ग ठेकेदाराकडून करण्यात येत होता. ते बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने मोठी झाडे तोडण्यात आली तसेच सिमेंटचे मोठे पाईप ओढ्यात टाकून सांडपाणी वाहण्यासाठी मार्ग बनवला जात होता. या विकास कामांच्या नावाखाली चाळीस ते पन्नास झाडांची कत्तल ठेकेदाराकडून विनापरवाना करण्यात आली आहे.

या नाल्याचा सर्व परिसर ग्रीन झोन (Green Zone) मध्ये असल्यामुळे येथील झाडे तोडण्याकरिता कोणाची परवानगी घेतली गेली का, असा सवाल तळेगावातील वृक्ष प्रेमींनी विचारला असता यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर आले आहे. बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी अधिकारीवर्ग हे प्रकरण दाबत असून तोडलेली झाडांचे पुरावे गेल्या दोन दिवसांपासून नष्ट करण्याचे काम तिथे चालू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ग्रीन झोनमध्ये वृक्ष तोडीस तसेच बांधकाम करण्यास परवानगी आहे का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. तर दुसरीकडे, जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांनी येत्या सहा दिवसांत दोषींवर कारवाई केली नाही, तर झाडांची दशक्रिया विधी आंदोलन करू असा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.

मात्र, या झाडांच्या केलेल्या कत्तलीबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिघे यांना विचारणा केली असता, झाडे तोडण्याबाबत कोणत्याच प्रकारची परवानगी दिलेली नाही. विनापरवाना झाडांची कत्तल झाली असेल, तर यात समावेश असणाऱ्या सर्वांना नोटीस पाठवून त्यात दोषी आढळल्यास दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

झाडांमुळे तळेगाव नगरीचे सौंदर्य मागील अनेक वर्षांपासून अबाधित आहे. या झाडांवर अनेक पक्षांची घरटी होती. झाडांची कत्तल केल्याने अनेक पक्षी बेघर झाले. एकीकडे सरकार झाडे लावा च्या घोषणा देत असताना दुसरीकडे मात्र मावळमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याने आता दोषींवर कधी आणि काय कारवाई होणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT