Matheran Ghat Accident: Tempo Carrying 20 Tourists Overturns, Eight Seriously Injured saam tv
महाराष्ट्र

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

Major Mishap on Matheran Road : माथेरान घाट रस्त्यावर २० पर्यटकांना घेऊन जाणारा 'महिंद्रा कॅरी' टेम्पो उलटला. यात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी नेरळ येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.

Bharat Jadhav

  • २० पर्यटकांना घेऊन जाणारा महिंद्रा कॅरी टेम्पो उलटला.

  • अपघातात आठ पर्यटक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

  • आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले.

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

माथेरान घाट रस्त्यावर सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास छोट्या महिंद्रा कॅरी टेम्पोचा भीषण अपघात झाला. २० पर्यटकांपैकी आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना नेरळ येथील सुदिन नर्सिंग होम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. टेम्पोमध्ये महिला पर्यटकांचाही समावेश होता. मात्र, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पावसाळ्यात निसर्गाचे सौदर्य पाहण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत असतात. अनेक पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी असते. असेच एक सर्वाचं आवडत ठिकाण म्हणजे माथेरान. पावसाळी सहलीसाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. जे वाहन मिळेल त्या वाहनाने पर्यटक येथे असतात. आजही मुंबईतील काही पर्यटक माथेरानला जात होते. मात्र वाटेतच त्यांच्या टेम्पोचा अपघात झाला.

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी परतीच्या वेळी दस्तुरी नाका येथे टॅक्सी मिळण्यास विलंब होत असल्याने काही पर्यटकांनी महिंद्रा कॅरी टेम्पो (क्र. एमएच ०५ एफजे ७४१४) मधून नेरळच्या दिशेने प्रवास सुरू केला.

दरम्यान, माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी येथील धोकादायक एस-टर्न वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो समोरील सिमेंटच्या संरक्षक कठड्यावर आदळून पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नेरळ पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने नेरळ येथील सुदिन नर्सिंग होम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून काही पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जखमींमध्ये साई रोहित कोंडा (वय २३, करावेगाव, सीबीडी बेलापूर), कैफ अन्सारी (वय २३, गोवंडी), रोज सईद (वय २२, गोवंडी), कुणाल शिंदे (वय २५, घाटकोपर), उबेश शेख (वय २३, मानखुर्द) तसेच माथेरान येथील काही प्रवासी असे एकूण आठ जणांचा समावेश आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस अधिक तपास करीत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

जगाला कॅन्सरला विळखा, WHOच्या अहवालानं जगभरात खळबळ

मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

SCROLL FOR NEXT