Weekend Rush Causes Major Traffic Chaos on Mumbai-Pune Highway Saam
महाराष्ट्र

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Weekend Rush Causes Major Traffic Chaos on Mumbai-Pune Highway: जुन्या मुंबई पुणे हायवे वरील सोमाटने टोलनाका जवळील चौकात वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगच रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Bhagyashree Kamble

जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटने टोलनाका जवळील चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंदाजे २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग दिसत आहे. त्याचबरोबर उर्से टोलनाक्याजवळून येणाऱ्या रोडवरही मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यानंतर शनिवार-रविवारच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक आपल्या खाजगी वाहनांतून मुंबईकडे परत येत आहेत. मात्र, या परिस्थितीत फक्त एकच ट्रॅफिक हवालदार रोडवर असून, वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २-३ किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. दिवाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतूक कोंडी निर्माण झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव शहर ते तिलोरे फाटापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाले. पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना तासंतास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

Skin Care : तेलकट त्वचेसाठी नैसर्गिक घरगुती टिप्स, ट्राय करुन बघा

SCROLL FOR NEXT