Chandrapur Fire News Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur: बल्लारपूर पेपर मिल आग धुमसतेय; २५ कोटींवर नुकसान

रविवारी रात्री बल्लारपूर पेपर मिलला लागलेली आग अद्याप विझली नव्हती.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या (ballarpur paper mill) लाकूड डेपोला लागलेल्या आगीवर (fire) नियंत्रण मिळवण्याचे काम आजही (साेमवार) सुरु आहे. रविवार रात्रभर अग्निशमन (fire brigade) बंब कार्यरत असूनही ती आटोक्यात येऊ शकलेली नाही. सुमारे २० एकर जागेवर पसरलेल्या या डेपोत अंदाजे ५५ हजार टन लाकूड साठवले होते. या आगीत सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (ballarpur paper mill fire latest marathi news)

बल्लारपूर शहरालगत कळमना येथे रविवारी लाकूड डेपोला लागलेल्या भीषण आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप विळख्यात सापडला. सुमारे २० एकरावर पसरलेल्या या डेपोत १५ हजार टन सुबाभूळ- बांबू- निलगिरीचा साठा होता. हा साठवण डेपो बल्लारपूर पेपर मिलच्या मालकीचा आहे. चंद्रपूर-अहेरी मार्गाच्या कडेलाच हा डेपो आणि पेट्रोल पंप असल्याने बराचवेळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सुमारे २० किलाे मीटर दूर चंद्रपूर शहरातून आगीचे लोळ दिसत हाेते. अग्निशमन बंबांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील आग पेट्रोल पंपापर्यंत पोचली. हा पंप तीन दिवसांपासून बंद होता. मात्र स्थानिकांनी स्फोटाचे आवाज ऐकले.

चंद्रपूर-अहेरी महामार्गावर असलेला हा डेपो आता पुर्णपणे बेचिराख झाल्याने पेपर मिलचे मोठे नुकसान झाले आहे. दोन डेपोच्या मध्ये असलेला एक पेट्रोल पंपही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. आज (साेमवार) सकाळी घटनास्थळी केवळ राख दिसत हाेती. धूराचे लाेट परिसरात पसरले हाेते. या आगीमुळे प्राथमिक अंदाजनूसार २५ काेटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT