Tadoba News: ताडाेब्यात १५०० प्राणी वाढले; वाघांसह बिबट्यांचा समावेश

कोरोनामुळे मागील दोन वर्षे वाघांची गणना होऊ शकली नव्हती.
Tiger
Tigersaam tv
Published On

चंद्रपूर (tadoba tiger) : बुद्ध पौर्णिमेला मचाणावरून करण्यात आलेल्या प्राणीगणनेत यंदा वाघ (tiger) आणि बिबट्यांच्या (leopard) संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २०२० कालावधीत झालेल्या गणनेत ३६ वाघ आढळून आले आहेत. यंदाच्या गणनेत त्याची संख्या ४४ वर पाेहचली आहे. वाघांच्या संख्येत झालेली वाढ ताडोबाच्या (tadoba) दृष्टीने अतिशय आनंदाची असल्याचे सांगितले जात आहे. (tadoba tiger latest marathi news)

बुद्ध पौर्णिमेला (buddha purnima) दरवर्षी मचाणावर प्रगणकांना बसवून प्राणी गणना केली जाते. यावेळी या उपक्रमाला निसर्ग अनुभव असे नाव देण्यात आले हाेते. मचाणावरून केलेली प्राण्यांची मोजणी ही शास्त्रीयदृष्ट्या कुचकामी आहे. मात्र ढोबळमानाने प्राण्यांचे अस्तित्व, त्यांची विविधता यात कळते. शास्त्रीयदृष्ट्या केलेल्या गणनेला याचा आधार मिळतो, एवढाच याचा फायदा. त्यामुळे ही कवायत दरवर्षी घेतली जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ही गणना होऊ शकली नाही. आता ती घेतल्यानंतर प्राणीविश्वाच्या दृष्टीने आशादायी आकडेवारी समोर आली आहे.

Tiger
Gujarat: फार्मा कंपनीस भीषण आग; अग्निशमन विभाग दाखल

डॉ. जितेंद्र रामगावकर (क्षेत्र संचालक, ताडोबा) यांनी दिलेल्या माहितीनूसार सन २०२० मध्ये ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात मिळून ३६ वाघ होते. आता त्यात वाढ होऊन ही संख्या ४४ वर पाेहचली आहे. बिबट्यांची संख्याही नऊ वरून ११ झाली आहे. या भागात इतर प्राणीही वाढले आहेत. यामध्ये मोर (peacock) २३१ वरून २४५, रानकुत्री ७४३ वरून १२६९ इतकी झाली आहेत. सर्व प्राण्यांची संख्याही सुमारे दीड हजाराने वाढली आहे. सन २०२० मध्ये ३४५४ इतकी हाेती तर सन २०२२ मध्ये ४९१८ इतकी प्राण्यांची नोंद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Tiger
सामच्या बातमीची दखल; राज ठाकरेंनी अंध मुलांना व्यासपीठावर बोलावून जिंकली मने!
Tiger
Thailand Open 2022: सिंधूचा यामागुचीवर विजय; उपांत्य फेरीत चेन युफेईशी लढत
Tiger
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com