Encounter Between Police And Naxalites Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यात मोठी चकमक; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Encounter Between Police And Naxalites: गडचिरोली जिल्ह्यातील छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झालीय. या चकमकीत पोलिसांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय.

Bharat Jadhav

मंगेश भांडेकर, साम प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक घडलीय. या चकमकीत १२ नक्षलावाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केलाय. चकमक झालेलं ठिकाण हे जारावंडी पोलीस स्टेशनअंतर्गत येतं.

विशेष म्हणजे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी याच परिसरात सुरजगड इस्पात येथे स्टील कारखान्याच्या प्रकल्पाचं उद्धघाटन झालं. या उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. दरम्यान, गडचिरोली पोलिसांचे C-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास चकमक उडाली.

या चकमकीत सी-६० पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत. त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. चकमकीत जखमी झालेल्या उपनिरीक्षक सतीश पाटील यांना हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले. C60 चा एक PSI आणि एक जवान गोळीबारात जखमी झालेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले. ज्यामध्ये 7 C60 पथकांना वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आले. गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. दुपारी दीड वाजता नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली.

संध्याकाळी उशिरापर्यंत ६ तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. परिसरात केलेल्या शोधकार्यात आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत. आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आलीत. DVCM लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम, टिपागड दलम प्रभारी हे मृत नक्षल्यापैकी एक असल्याची ओळख पटलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT