Ineligible beneficiaries exposed in Ladki Bahin Scheme; ₹165 crore scam revealed during Maharashtra Assembly session. Saam Tv
महाराष्ट्र

अपात्र लाडकींनी लुटले 165 कोटी, 12 हजार पुरुषांचाही सरकारी तिजोरीवर डल्ला

Ladki Bahin Yojana: मोठा गाजावाजा झालेल्या लाडक्या बहिण योजनेत बोगस लाभार्थ्यांचे कारनामे समोर आलेत. अपात्र बहिणींनी शासनाचे तब्बल 165 कोटी रुपये लुटले आहेत. अधिवेशनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Girish Nikam

विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता देण्यात मोठा वाटा असणा-या लाडकी बहिण योजनेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला. काटेकोर निकष लावल्यानंतर आणि सर्व्हेक्षणानंतर या योजनेचं धक्कादायक वास्तव समोर येतंय. वर्षभरात राज्य सरकारचे तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लुटले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिलीय.

यामध्ये 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी रुपये लाटलेत तर 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटींवर डल्ला मारला आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडूनही लाभाचे पैसे वसुल केले जाणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

लाडकी बहिण योजनेत काटेकोर छाननी सुरु झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळली आहेत. त्यानंतर सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलंय. ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 अशी करण्यात आली आहे. डोईजड झालेल्या या योजनेमुळे कारभार करताना सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. विरोधकांच्या टीकेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लाडकी बहिण योजना सुरुच राहणार असल्याचं महायुतीचे नेते वारंवार सांगत आहेत. मात्र नवीन वर्षात तरी योजनेत पारदर्शकता येऊन फक्त गरजू लाडक्या बहिणींनाच महिना 1500 रुपये मिळतील, अशी अपेक्षा करुयात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT