Politics Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं! शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; शरद पवार गटालाही हादरा बसला

Shiv Sena Thackeray Group Resignations: ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे पक्षातील पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तसेच शरद पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नेते, आमदार किंवा कार्यकर्ते आपल्या पक्षाला राम राम ठोकून दुसर्‍या पक्षात प्रवेश करत आहेत.

अशातच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे पक्षातील पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटातील शिवसेना, युवासेना, सहकार क्षेत्र आणि शिवसहकार आदी आघाड्यांतील पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार निवडून आल्यानंतर पक्षाचा दर्यापूर विधानसभा क्षेत्रात मोठा बोलबाला झाला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसून, लक्ष देत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दर्यापूर मतदारसंघात पक्षांतर्गत कार्यकारणी निवडीत आणि नूतन तालुकाप्रमुख निवडताना जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तसेच ज्यांनी ठाकरे पक्षाच्या उमदेवाराचे निवडणुकीत काम केले नाही. त्यांनाही नूतन कार्यकारणीत स्थान देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे अनेक पदाधिकाऱ्यांची मने दुखावली असल्याची माहिती समोर आली आहे.

परिणामी त्यांनी अमरावती रोड शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिल्यानंतर आता हे पदाधिकारी नेमकं कोणत्या पक्षात जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाच्या युवक जिल्हाध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

सांगलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून विराज नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एसटी प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढला होता. मात्र, अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. तर मुलाच्या राजीनाम्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक हे देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT