Shivajinagar Police Station, Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या विवाहितेची रोडरोमिओंकडून छेडछाड, तरुणी गंभीर जखमी

विवाहित तरुणी गंभीर जखमी असल्याने 2 दिवस होती बेशुद्ध... तर शरीराला सगळीकडे मार लागल्यानं तिच्या पोलीस होण्याच्या स्वप्नावर विरजण...

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय. शहरातील 26 वर्षीय विवाहित तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून आपलं पोलिस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, जिवाचे रान करत होती. गेल्या 5 मे रोजी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान, पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रासोबत, ती शहरातील चराटा फाटा परिसरातील, ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी गेली होती. यावेळी दोन गुंड प्रवृत्तीच्या रोडरोमियोनी तिला गाडी आडवी लावून अडवलं. "तुझं स्कार्फ सोड, मला तुझा फोटो काढायचा आहे." असं म्हणत त्याने चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

मात्र आपला जीव वाचवण्यासाठी तिने आपली स्कूटी चालू करत, तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान त्या 2 रोडरोमियोनी तिचा पाठलाग करत, तिला स्कूटीवरून खाली पाडलं. यामुळे तिच्या पूर्ण शरीरावर मोठंमोठ्या जखमा झाल्या आहे. पोटाला जवळपास 15 टाके पडले आहेत. तर चेहऱ्यावरही मोठी दुखापत झाल्याने हनुवटीला टाके आहेत. एवढेच नाही तर हात असो वा पाय असो सर्वच, ठिकाणी मोठमोठ्या जखमा झाल्या आहेत.सध्या पीडित विवाहित तरुणीवर शहरातील लोट्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्या दोन नराधम गुंड रोडरोमिओंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याची दखल घेत एका आरोपीला अटक केलीय. तर दुसऱ्या आरोपीचा शोध शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

मात्र माझ्या मुलीचं स्वप्न अधुरं राहिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलिस भरतीमध्ये, अवघ्या काही मार्काने ती पोलीस बनू शकली नाही. म्हणून पुन्हा एकदा ती जिद्दीने आपली प्रॅक्टिस करत होती. पहाटे ती प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंडवर गेली आणि ही घटना घडली. मायबाप पोलिस आणि सरकारने या 2 आरोपींना कठोर शासन करत कारवाई करावी. जेणेकरून माझ्या मुलींसारखं इतर मुलींचं स्वप्न अधुरं राहणार नाही आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही. अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केलीय.

विशेष म्हणजे महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, या देखील बीड जिल्ह्यातीलच आहेत. मात्र त्यांनी देखील आजपर्यंत या जखमी विवाहिता तरुणीची भेट घेतली नाही. नेमकं काय प्रकार घडला आहे, हे देखील विचारावासा त्यांना वाटलं नाही का . त्यामुळे महिला आयोग देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचंच समोर आलंय.

दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून, महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुठे चिमुकलीवर बलात्कार तर कुठे विवाहितेवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. तर काल-परवाच एका 17 वर्षीय मुलीने रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या सर्व घटना ताज्या असतानाच, पुन्हा एकदा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारी विवाहिता तरुणी, गुंड प्रवृत्तीच्या रोडरोमिओंची बळी पडली. आणि यामुळं तिला आता शारीरिक एक प्रकारचं अपंगत्व आलंय. यामुळे आता तिचे पोलिस बनण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असून या स्वप्नांवर रोडरोमियोंनी विरजण टाकलय. यामुळे आता कायद्याने कारवाई होईलच, मात्र ही घातक प्रवृत्ती कधी थांबणार ?असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT