'दोन छोट्या फुलपाखरांनी गरजेपेक्षा जास्त...' रानबाजारच्या ट्रेलरनं उडवली झोप!

सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून रानबाझार चा ट्रेलर चर्चेत आहे. या वेब सिरीजचा बोल्ड टिझर पाहून प्रेक्षक वर्गाकडून ट्रोलही करण्यात येत होते. तर दुसरीकडे तेवढीच उत्सुकता देखील दिसून येत होती.
Ranbazar
RanbazarSaam Tv
Published On

श्रेयस सावंत

मुंबई: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून रानबाझार चा ट्रेलर चर्चेत आहे. या वेब सिरीजचा बोल्ड टिझर पाहून प्रेक्षक वर्गाकडून ट्रोलही करण्यात येत होते. तर दुसरीकडे तेवढीच उत्सुकता देखील दिसून येत होती. या सिरिजच्या टीझरमध्ये तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्डनेस बघून सर्वचजण थक्क झाले होते. आता याचा दमदार ट्रेलर रिलीज झाला झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची झोप अडवली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या वेब सिरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे, असे सांगण्यात येत आहे. (ranbazar trailer)

Ranbazar
नाशिक: पोलीस दलातील एक महिला अधिकारी, दोन कर्मचारी ACB च्या जाळ्यात!

रेगे, ठाकरे असे विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या वेब सिरिजच्या दिग्दर्शन केले आहे. पॉलिटीक्स- क्राइम विषयावर आधारीत असलेल्या या वेब सिरिजमधील कलाकारांची मोठी फौज आपल्याला बघायला मिळत आहे. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्यासह उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका यामध्ये दिसून येत आहे.

तर, तेजस्विनीने सिरिजचा एक छोटासा टीझर शेअर केला होता. त्याला कॅप्शन दिले होते, ''दोन फुलपाखरं फडफडली… आणि सत्तेला बसला हादरा ! ‘रानबाजार’ ट्रेलर येतोय… 18 मे ला!''

सिरिजच्या ट्रेलरमध्ये गुंतागुंतीच राजकारण आणि गुन्हेगारी आहे, थरार आहे. तसेच यात बोल्डनेस चा तडका दिसून येत आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) आतापर्यंतच्या कॉन्टेंटमध्ये हा सर्वोत्कृष्ट कॉन्टेंट असेल. ही वेब सिरिज येत्या 20 मेपासून प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा ट्रेलर;

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com