तरबेज शेख
नाशिक: शहर पोलीस दलात लाच (Bribe) घेण्याचे प्रकार वाढले असून दोन दिवसात सलग दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहे. काल आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले आहे.
हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकारांलची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.
या लाच प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
हे देखील पहा-
एकीकडे गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल बदली करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.