फेसबुकवरील मैत्री पडली महागात! नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

फेसबुकवरील मैत्री पडली महागात! नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

जळगाव येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : जळगाव (Jalgaon) येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील (Nagpur) विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार बलात्कार (facebook friend abuse married woman) केला आहे. आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे (marriage) आमिष दाखवून तिच्याबरोबर अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहे.

यामधून पीडित महिला गर्भवती (pregnant) राहिल्यावर, आरोपीने पीडितेवर दबाव टाकून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते. यानंतर आरोपीने लग्नाला नकार देत, तिची फसवणूक (Marriage fraud) केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

देवेंद्र विकास पवार असे ३८ वर्षीय आरोपीचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील चांदसार या गावातील रहिवासी आहे. तर ३६ वर्षीय पीडित महिला नागपुरातील जरीपटका परिसरातील रहिवासी आहे. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. पण पतीबरोबर पटत नसल्यामुळे मागील काही दिवसापासून पीडित महिला पतीपासून वेगळे राहत आहे.

दरम्यान, २०१७ साली पीडित महिलेची जळगावातील देवेंद्र याच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. कालांतराने संवाद वाढत गेल्यावर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. सुरुवातीला काही दिवस चॅटींग केल्यानंतर देवेंद्र याने पीडितेला जळगावात भेटण्यासाठी बोलावले. याठिकाणी आरोपीने पीडित महिलेला आपल्या मित्राच्या घरी नेऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.

तसेच तिला लग्नाचे आमिष देखील दाखवले. त्यामुळे पीडित महिला आपल्या पतीला घटस्फोट देऊन आरोपी देवेंद्र याच्याशी लग्न करणार होती. आरोपी देखील नागपूराला येऊन पीडित महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागला. दरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली. पण आरोपीने पीडितेवर दबाव आणून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. यानंतर आरोपीने लग्नाला नकार देत तिची फसवणूक केली आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी देवेंद्र विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरीपटका पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT