Winter Session 2021 : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

विधान सभेच्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरुवात होणार
Winter Session 2021 : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
Winter Session 2021 : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठकSaam Tv

मुंबई : विधान सभेच्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याभरात (week) राज्यात भरती घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. याच आधारे विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

यामुळे विरोधकांच्या कोंडीमध्ये पकडणाऱ्या प्रश्नांना प्रत्युत्तर देण्याची रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची (MLA) अधिवेशन सुरु होण्याअगोदरच आज सकाळी ९ वाजता बैठक सुरु झाली आहे. याबरोबरच अनेक विषयांवरुन विरोधीपक्ष महाविकास आघाडी सरकारला (government) कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) निर्णय राज्य सरकारच्या विरोधामध्ये गेला आहे.

हे देखील पहा-

त्यातच केंद्राने इंम्पिरिकल डाटा राज्याला न देण्याने या विषयावरून विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन माजण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Assembly Session) विरोधकांच्या आरोपांना कोणत्या रणनितीने प्रत्युत्तर द्यायचे याकरिता महाविकास आघाडीच्या आमदारांची सकाळी ९ वाजता बैठक सुरु झाली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल चहापानावर बहिष्कार घालत हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले होते.

Winter Session 2021 : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन सस्ता गुळगुळीत...

यावेळी त्यांनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष कोणत्या मुद्द्यांना हात घालणार याची देखील झलक दिली होती. त्यांनी १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, शक्ती कायदा करण्याच्या महाविकास आघाडीच्या घोषणेचा मुद्दा यावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट केले होते. याचबरोबर ओबीसी आरक्षण, भरती घोटाळा हे ज्वलंत विषय देखील यामध्ये आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com