कोकणातील 30 लहान मोठ्या नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार विनोद जिरे
महाराष्ट्र

कोकणातील 30 लहान मोठ्या नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार

कोकणच्या पूर परिस्थितीवर व मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमचा तोडगा निघणार

विनोद जिरे

बीड : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे व मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवावा. यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत होते. ही योजना पूर्ण करण्याचा संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल. असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजीमंत्री क्षीरसागर यांना दिले आहे. मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ या योजनेने नाहीसा होईल, असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील पहा -

या योजनेला फडणवीस सरकारच्या काळात तत्वतः मान्यता देण्यात येऊन, यावर अभ्यास गट नेमण्यात आला होता. तेव्हा 18 हजार कोटींचा अंदाजित प्रकल्प खर्च प्रस्तावित होता. हा प्रकल्प पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर परस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र मराठवाड्यात अजून ही जेमतेम पाऊस झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या विरोधाभासावर कायमचा तोडगा काढण्याचा उद्देश घेऊन, सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. यात कोकणच्या 30 लहान मोठ्या नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी, कायम दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाड्याला वळविण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. जवळपास 135 टीएमसी पाणी कोकणातुन गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT