Marathwada News  Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक; अपुऱ्या पावसामुळे पाणीसंकट, धरणांमध्ये किती पाणीसाठा?

Rain Update News : पावसाळा कोरडेठाक गेल्यानं मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 877 प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नाही.

डॉ. माधव सावरगावे

Marathwada News :

मराठवाड्यात  पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासोबतच उन्हामुळे उभी पिकं माना टाकू लागली आहे. उद्योगांवर देखील जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पावसाळा कोरडेठाक गेल्यानं मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 877 प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नाही.

सध्या मागच्या वर्षांतील शिल्लक असलेलं पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे केवळ 42 टक्केच उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच उद्योगावर जलसंकट येणार असं चित्र आहे.  (Maharashtra News)

आता उर्वरित पावसाळ्याच्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर पुढच्या काळात पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी 86.87 टक्के जलसाठा होता. सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा आहे.

आजही संपूर्ण मराठवाड्यात उन्हाळ्यासारखं ऊन पडलं आहे. आकाश निरभ्र आहे. उन्हामुळे पिकं सुकत चालली आहे. पाऊस कधी पडेल ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. (Latest Marathi News)

यंदाच्या पावसाळ्यातले 78 दिवसांपैकी अर्धे दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे तब्बल २२३ मिलीमीटर पावसाची तूट भरून निघणार कशी असा प्रश्न आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी-मका या प्रमुख पिकांसोबत खरीपाच्या सर्व पिकांचा काळ अर्ध्यावर येऊन पोहचलाय. मात्र, पावसाअभावी वाढ खुंटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

SCROLL FOR NEXT