Rain Forecast in Maharashtra : विश्रांतीनंतर पावसाचं पुन्हा कमबॅक होणार? राज्यात पावसाला पोषक वातावरण, हवामान विभागाचा अंदाज काय?

Rain Alert in Maharashtra : भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv
Published On

Rain Update : राज्यात काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचं आज आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागने दिला आहे. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या शेवटी राज्यात मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागील दोन आठवडे राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे सरकणारा मॉन्सूनचा आस आणि बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचे पुनरागमन होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra News)

Monsoon 2023
Sharad Pawar: आज बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार; 27 ऑगस्टला अजित पवारांची उत्तर सभा

राज्यात ढगाळ हवामान वाढेल, तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Monsoon 2023
Mumbai Crime News: सायन रेल्वे स्थानकावर जोडप्याची तरूणाला मारहाण, रुळावर पडताच लोकलने उडवलं; नेमकं काय घडलं?

नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com