District Collector Kiirti Kiran Pujar dancing at Tulja Bhavani Cultural Festival amid Marathwada flood crisis — raising serious public concerns. Saam Tv
महाराष्ट्र

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Marathwada Flood Crisis: मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय... ज्यांनी आधार द्यायला हवा तेच अधिकारी नाचगाण्यात दंग झालेत... मात्र कोण आहे हा अधिकारी? आणि एवढ्या असंवेदनशीलपणे वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?

Omkar Sonawane

शेतकरी पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला असताना गार डोंगराची हवा गाण्यावर निर्लज्जपणे ठेका धरलेले हे आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार....पुन्हा पाहा जिल्हाधिकाऱ्यांनी कसा असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय....

पुरानं शेती वाहून गेलीय... पीकं उद्ध्वस्त झालेत.. जनावरं मरुन पडलेत.. शेतकरी हवालदिल झालाय.. अख्खं मंत्रिमंडळ नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर गेलं.. मात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत करुन दिलासा देण्याऐवजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे थेट तुळजा भवानी मंदिरातील सांस्कृतिक महोत्सवात नाचगाण्यात रमले आहेत.. या धांगडधिंग्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत...

राज्यात एवढी विदारक परिस्थिती असताना आणि शेतकऱ्याचा संसार उघड्यावर पडले असताना अधिकारी नाचगाण्यात दंग होऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का? असा सवाल निर्माण झालाय... त्यामुळेच या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलेत...

आधी संभाजीनगर जिल्ह्यात पंचनाम्यासाठी आलेल्या मंडल अधिकाऱ्याच्या धमकीमुळे शेतकऱ्यानं जीवन संपवलं... दुसरीकडे अकोल्यातही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे 300 एकर शेतात पाणी घुसलं... आता चक्कं जिल्हाधिकाऱ्यांचाही असंवेदनशीलपणा समोर आलाय.. त्यामुळे सरकार विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर कठोर कारवाई करणार का..असा प्रश्न आहे ? आणि ही कारवाई केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित न त्याचा धाक सगळ्याच उद्दाम अधिकाऱ्याना बसला पाहिजे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT