Marathwada Farmer Saam
महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाचं रौद्ररूप; १ हजार ४१८ कोटी रूपयांचं नुकसान, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

Marathwada Farmer: मराठवाड्यात सलग ४ दिवस पावसानं थैमान घातलं. शेतकऱ्यांचं नुकसान. डोक्यावर कर्जाचं डोंगर. शेतकरी हवालदिल.

Bhagyashree Kamble

  • सलग ४ दिवस मराठवाड्याला पावसानं झोडपलं.

  • शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान.

  • डोळ्यांसमोर पिके वाहून गेली.

मराठवाड्यात सलग चार दिवस मुसळधार पावसानं थैमान घातलंय. यामुळे जनजीवन विस्कळीत तर झालीच, सोबतच शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. चार दिवस अतिवृष्टी झाल्याने हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, पैठण तालुक्यातील अनेक शिवारामध्ये पाणी घुसलंय. यामुळे पीक तर वाहून गेली, सोबतच शेतही वाहून गेलं, असं एकंदरीत चित्र समोर आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धावडा गावातील अल्पभूधारक शेतकरी गणेश बनकर यांची पावसाने अर्धी शेती वाहून नेली. तर उर्वरित पीक जमीनदोस्त झाली आहे. गणेश बनकर यांची अडीच एकर शेती आहे. या शेतात एक एकर चवळी आणि दीड एकर कोबीची लागवड केली होती. मात्र, महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं.

महापुराच्या पाण्यातून एक एकर कोबी आणि अर्धा एकर चवळी पूर्णपणे वाहून गेली. इतकेच नव्हे, तर शेतजमिनीवरील सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतजमीन खरडून पडली आहे. यामुळे पुढील काळात शेती करणेही कठीण झाले आहे. एका रात्रीत हिरवळलेली बागायती जमीन उघडी आणि वाळवंटी झाली. हा प्रसंग त्या शेतकऱ्यासाठी केवळ पिकांचे नुकसान नसून आयुष्यभराची पेरलेली आशा हिरावून नेणारा ठरला आहे. रात्रंदिवस अख्या कुटुंबांना मेहनत करून शेती पिकवली, पण डोळ्यासमोरच ती वाहून गेली. मग खायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय.

शेती वाहून गेली. शेतीतलं पीक वाहून गेलं. सोबतच कर्जाचं डोंगर डोक्यावर उभं राहिलं. आता या शेतीतून पिकवायचं तर सोडून द्या, ती सुस्थितीत आणायचं असेल तर मोठा खर्च लागणार आहे. आता तो खर्च कुठून आणायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भविष्यात कसा करायचा? अशी चिंता या कुटुंबाला आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला मदतीच्या हाताची गरज आहे.

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आठवडाभरापासून मराठवाड्यातील अनेक भागात संततधार कोसळत आहे. यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालंय. अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानीसाठी पन्नास टक्के म्हणजेच ६३० कोटींची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. चार जिल्ह्यांतील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे आकडे अद्याप स्पष्ट नाहीत. अद्याप सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा समोर आला नाही.

सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हे स्पष्ट नाही. आतापर्यंत ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी बाधित झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही, ई- पीक पाहणी सर्व्हर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन चुकीचे दिसणे, खाते क्रमांक न जुळणे आदी अडचणींमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाहीत.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात प्रामुख्याने पीक नोंदणी, आधार-बँक खाते लिंक नसणे, पंचनामा प्रक्रियेतील विलंब, नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीची प्रतीक्षा व निधी वितरणातील समस्या या प्रमुख अडचणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Liver Detox Juice: लिव्हरला चिकटलेली घाण झटक्यात साफ होणार; घरात तयार करा '3' DETOX Drinks

Shocking: बिहार हादरलं! पोलिसासोबतचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला बंदुकीने मारहाण, हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT