MARATHI YOUTH LEADER ABHIJIT DIPKE SHAKES DELHI OVER NEET PROTEST saam tv
महाराष्ट्र

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

Cockroach Janta Party protest impact on central government: मराठमोळ्या अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला मोठं यश; केंद्र सरकारला झुकावं लागलं, तरुणाईचा आवाज बुलंद

Suprim Maskar

ऐकलतं..... मराठमोळ्या तरुणानं दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्यावर केलेलं पहिलं विधान....

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे नेहमी म्हटलं जातं. मराठी माणसांनी दिल्लीच्या तख्ताला अनेकदा हादरवलेच नाही तर सत्ताधीशांना झुकवल्याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात. मात्र आता दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा मराठी माणसाने धक्का दिलाय... आणि त्याला कारण ठरलयं... नीट पेपरफुटी प्रकरण....याचं नीट पेपरफुटीविरोधात तरुणांच्या हक्कासाठी छेडलेल्या आंदोलनासमोर अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक असणाऱ्या मराठमोळ्या अभिजीत दिपकेंनी महिन्याभरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.... सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यानच्या बेरोजगार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा झुरळ म्हणून उल्लेख केला आणि बस हा एक शब्द उचलून अमेरिकेत असलेल्या मराठमोळ्या अभिजीत दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टी नावानं सोशल मीडियावरच पक्षाची स्थापना केली...

आणि नीटच्या पेपरफुटीचं निमित्त साधत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचाच अजेंडा सेट केला आणि त्यांच्या पक्षाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला...तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त तरुणांनी त्यांना फॉलो केलं....देशातल्या राजकीय ढुढ्ढचार्यांनी या ऑनलाईन कॉक्रोचेसची टिंगल टवाळी केली. मात्र अभिजीत एवढ्यावर थांबले नाहीत. त्यानं थेट अमेरिकेतून दिल्ली गाठली आणि रस्त्यावरचा लढा सुरू केला. आणि तो साऱ्या देशानं पाहिला....हा मराठमोळा अभिजित नेमका कोण आहे पोहूयात....

कोण आहे अभिजीत दिपके?

दिपकेंचे पुण्यामधून पत्रकारितेचे आणि अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीतून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण

2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचारात दिपकेंची भूमिका महत्त्वाची

आपच्या यूथ सेंट्रिक डिजिटल मीडिया कॅम्पेनचे दिपके मुख्य रणनीतीकार

दिल्लीच्या CMO कार्यालयात काम करण्याचा दिपकेंना अनुभव

नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातील मागणीमुळे दिपकेंच्या दिल्लीतील आंदोलनाला तरुणाईचा पाठिंबा मिळला..मात्र 20 जुलैला आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आंदोलनाचा टर्निग पॉईंट ठरला... त्यात वांगचुक यांनी उपोषण सोडल्यावर दिपकेंनी उपोषणाचा पवित्रा घेतल्यानं आंदोलनाची तरुणांमधील विश्वासार्हता वाढली आणि तरुणांचा सरकारविरोधातील रोषही वाढला... त्यामुळेच मराठमोळ्या दिपकेंचा या आंदोलनाच्या यशात मोठा वाटा आहे... त्यामुळेच आंदोलनाला यश मिळाल्यावर दिपकेंनी जे विधान केलं...ते फार सूचक आणि उदबोधक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

राजीनामा झाला, सुधारणांचं काय? भ्रष्ट यंत्रणांना आळा कसा घालणार?

GEN Z आंदोलनाला पहिलं यश, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, मात्र तरुणाईचं जिंकली

CJP च्या ३ मागण्या अन् सरकारची लेखी हमी; ४८ तासांत सरकारचं मन परिवर्तन कसं झालं?

देशातील लोकशाहीने कात टाकली, आंदोलनाच्या यशानंतर पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT