Today's Marathi News Live By Saam TV  Saam TV
महाराष्ट्र

Marathi News live update : अजित पवार गटाच्या नेत्याचा कबड्डी स्पर्धेत राडा, पंचालाच शिवीगाळ

Maharashtra Political Breaking News 20th July 2024: मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा उशिराने. महाराष्ट्रातील ताज्या, राजकीय घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या...

Vishal Gangurde

Pune Kabaddi Competiation: अजित पवार गटाच्या नेत्याचा कबड्डी स्पर्धेत राडा, पंचालाच शिवीगाळ

अजित पवार गटाच्या नेत्याचा कबड्डी स्पर्धेत राडा झालाय. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडलाय. अजित पवार गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांनी कबड्डी स्पर्धेच्या पंचालाच शिवीगाळ केलीय. शिवीगाळ करत बाबुराव चांदेरे यांनी पंचावर हात उगारलाय. जिल्हास्तरीय स्टेट लेव्हलच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा प्रकार घडलाय.

Wardha Rain: वर्ध्यातील यशोदा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, चना टाकळी गावाला पुराचा धोका

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा, यशोदा, वणा, बोर या नद्या दुभडी भरून वाहत आहे. यशोदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून देवळी तालुक्याच्या चना टाकळी या गावाला पुराचा धोका निर्माण झालाय. गावाच्या वेशीवर नदीचे पाणी पोहचले आहे. पावसाच्या सरी अश्याच सुरु असल्या तर गावातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. प्रशासनाने गावाकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून वेळ पडल्यास नागरिकांना स्थलांतरित करणार असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिलीय.

Wardha : वर्ध्यात गोठ्यावर वीज कोसळली, बैल ठार तर दुचाकी जळून खाक

वर्धा जिल्ह्यात सध्या विजाच्या कडकडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. समुद्रपूर तालुक्याच्या रासा येथे शेतकरी नलुबाई तोडासे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने आग लागली. या आगीत गोठ्यात दोन बैल, एक गाय व एक वासरू बांधून होता. यापैकी एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल, एक गाय व एक वासरू जखमी झाला आहे. या घटनेत गोठ्यात असलेली दुचाकी आणि शेतीसाहित्यसह जनावरांचे वैरण पूर्णपणे जळून खाक झालेत. घटनेत शेतकरी महिलेचे दोन लाखांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आलीय.

Indian Football Team :स्पेनचे मानोलो मार्केझ बनले भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक

सध्या इंडियन सुपर लीग (ISL) संघ एफसी गोवाचे प्रभारी स्पेनचे मानोलो मार्केझ यांची शनिवारी भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Buldhana : शेगाव येथील SBIच्या ग्राहक सेवा केंद्राला आग; रोख रकमेसह लाखोंची सामग्री जळून खाक

शेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या ग्राहक सेवा केंद्राला आग लागून रोख रकमेसह कॉम्पुटर , फर्निचर जळून खाक झाल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला लागूनच एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या जमिनीखाली असलेल्या पेट्रोल टाकीची साफसफाई सुरू असताना त्यातील पेट्रोल काही प्रमाणात बँक परिसरात पसरल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र आग तात्काळ नियंत्रणात आल्याने मुख्य शाखेला नुकसान झालं नाही.

Tulshi Talav:  मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळसी तलाव भरला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा  ‘तुळशी तलाव’ आज २० जुलै २०२४ रोजी सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

Uddhav Thackeray: जोमाने काम करा, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश

शिवसेना UBT पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा, उद्धव ठाकरे यांचे निर्देश आहेत. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे विधानसभा संपर्कप्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात पंधरा दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांचे संपर्कप्रमुखांना निर्देश

Chadrapur News: दुर्दैवी! दहा वर्षीय मुलगा पुरात वाहून गेला

पुराच्या पाण्यात एक दहा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलम या गावातील हा मुलगा असून रुणाल बावणे असे या मुलाचे नाव आहे. गावालगत आलेला पूर बघण्यासाठी तो गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पुलाकडे गेला. पाण्यात खेळताना त्याचा तोल गेला आणि प्रवाहात वाहून गेला.

Gadchiroli Rain: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भामरागड तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे १४ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे.

Pune Khadakwasla:  खडकवासला धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करणार

खडकवासला धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. उद्यापासून खडकवासलाचा नवीन मुठा उजवा कालवा सुरू होत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कालव्यात कोणी उतरू नये असं आवाहन करण्यात आलय. खरीब हंगाम सुरू करत आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Ratnagiri News: रत्नागिरीत मुसळधार पाऊस, दापोलीमध्ये दरड कोसळली

रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे दापोलीमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्याने नवसे भाटी उसगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

Ratnagiri News : गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथे डोंगर खचला

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथे डोंगर खचला आहे. डोंगर खचल्यामुळे आठ ते दहा फूट जमिनीचा भाग ओढ्यात कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, डोंगर खचल्यामुळे वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास रस्त्याचा भाग आणखीन खचण्याची भिती आहे.

Maharashtra Politics : माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर आज शरद पवार गटात प्रवेश करणार

माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर हे आज शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थित पिंपरी चिंचवड येथे सायंकाळी ४ वाजता हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सूर्यकांता पाटलानंतर नांदेडमधून दुसरा नेता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात करणार आहे.

 Hingoli News : धक्कादायक! विवाह लावून देत नसल्याने मुलानेच दिली आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी

हिंगोलीच्या बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कामठा गावात 38 वर्षीय मुलाने स्वतःचा विवाह आई-वडील लावून देत नसल्याने चक्क आपल्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, या प्रकाराने घाबरून गेलेल्या आई-वडिलांनी पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर फोन करून हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपी मुलगा मिलिंद रंगराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत

Amravati News : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडूंब

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात धगफुटू सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे नद्यां नाल्याना आला पूर आलाय. तर अनेक गावात शिरले पुराचे पाणी शिरलंय. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, तूर, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय.

Uddhav Thackeray : अदानींना धारावी देण्याचा डाव उधळून लावणार : उद्धव ठाकरे

उद्योगपती गौतम अदानी यांना धारावीतील विकासप्रकल्प देऊन सत्ताधाऱ्यांचा फसवणुकीचा डाव आहे. मात्र हा डाव आम्ही उधळून लावणार, असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. भूखंडाचं श्रीखंड लाटण्याचं याचं काम आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Nagpur Rain: नागपूरच्या नरेंद्र नगरमधील घरांमध्ये शिरले पाणी, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

नागपूरच्या नरेंद्र नगर येथील स्वामी स्वरूपानंद सोसायटीमध्ये आज झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या परिसरातील रस्ते जलमय झाले आहे. अनेक घरांमध्ये पावासाचे पाणी शिरले आहे.

Devendra Fadanvis: नागपूरात मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले सतर्क राहण्याचे आदेश 

नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. 'नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Indapur News: इंदापूरामध्ये शेती महामंडळ कामगार आणि वारसदारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

इंदापूरामध्ये शेती महामंडळ कामगार आणि वारसदारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट घेत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी येथे शेती महामंडळ कामगार आणि वारसदार यांच्या विविध मागण्यासाठी नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत.

Nandurbar News: नंदूरबार शहरामध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी

नंदुरबार शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. या सोबतच रेल्वे बोगद्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. रेल्वे बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकेला वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. या सोबतच दुचाकीस्वारांना देखील त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत

Bhandara News: भंडारामध्ये मुसळधार पाऊस, शहरातील रुख्मिणी नगरमधील अनेक घरात शिरले पाणी 

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर भंडारा शहरातील रुख्मिणीनगर येथे पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. तर रस्त्यावरून गुडघाभर पाणी साचलं आहे.

Wardha News: वर्धातील पोथरा प्रकल्प ओवरफ्लो, नदीलाही पूर

वर्धातील पोथरा प्रकल्प ओवरफ्लो झाला आहे. पोथरा नदीला पूर आल्याने सावंगी, सायगव्हाण, पिंपळगाव, लोखंडी गावांचा संपर्क तुटला. पोथरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune News: सर्व्हर डाऊनमुळे पुणे एअरपोर्टवरून उड्डाण करणारी १९ आणि पुण्याला येणारी २० विमाने रद्द

सर्व्हर डाऊनमुळे पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी १९ आणि पुण्याला येणारी २० विमाने रद्द करण्यात आली आहेत. तर ३०हून अधिक विमानांना उशीर झाला. बोर्डिंग पासही हाताने लिहून द्यावे लागल्याने नवीन आणि जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. देशात पुण्यासह नागपूर, मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकता आदी विमानतळांवरील सेवेला मोठा फटका बसला. 'इंडिगो'ची सर्वाधिक विमाने रद्द झाली. विमाने रद्द व उड्डाणांना उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Navi Mumbai: नवी मुंबईत मुसळधार पाऊस, महापे MIDC मधील रस्त्यांना नदीचे स्वरूप

नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. महापे एमआयडीसी परिसरातील सखल भागात पाणी साचले. महापे एमआयडीसीमधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. एमआयडीसीमध्ये कामाला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहे.

Beed News: बीडमध्ये एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघे गंभीर जखमी

बीडमध्ये एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील सिरसदेवी येथील ही घटना आहे. माजलगाव - पुणे या एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा

वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची माहिती

सोनी यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही - सूत्र

Mumbai Rain Update : मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील चार तासापासून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात साचले पाणी आहे. अंधेरी सबवेत अजूनही दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी साचलं आहे.

Mumbai News : भर समुद्रात जहाजाला लागली आग, तब्बल १२ तासांनी आगीवर नियंत्रण

भर समुद्रात जहाजाला लागलेली आग १२ तासांनी विझविण्यात आली आहे.

तटकरक्षक दलाच्या दोन युद्धनौकांनी ही आग विझविली. श्रीलंकेत जाणाऱ्या कार्गो शिपला लागली आग होती.

तटकरक्षक दलानं समुद्रात शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविली.

Raigad rain Update : रायगडमधील रोहा परिसरात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली

रोहा आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.

० नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

० कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

० कुंडलिकेची इशारा पातळी 23 मीटर, सध्याची पाणी पातळी 23.65 मीटर झाली आहे.

Mumbai Rain update : मुंबईत जोरदार पाऊस, बेस्टच्या मार्गात बदल 

मुंबईत सतत पडणाऱ्या पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका

मुंबईतील अनेक बेस्ट बसच्या मार्गात बदल

बस क्रमांक २८१, ३०२ , ३०३, ३२२, ३४५, ३५५, ३५७, ३६० ४६०, ४८८, ५१७ आणि ५३३ मार्गांमध्ये बदल करण्यात आलाय.

ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसच्या मार्गांमध्ये बदल

तिन्ही मार्गावरील लोकल सेवा देखील उशिराने

Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांची कार पोलिसांकडून जप्त

मनोरमा खेडकर यांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. मनोरमा यांची कार पौड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.

 Raigad bhise khind landslide :  रायगडच्या भिसे खिंडीत दरड कोसळली

० रोहा नागोठणे जोडणाऱ्या भिसे खिंडीत दरड कोसळली

० दरडीची माती आणि दरडी रस्त्यावर आल्याने आर्धा रस्ता बंद

Mumbai-pune Expressway Accident :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकजण ठार, एक गंभीर

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोचा अपघात

पहाटेच्या सुमरासा टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात

अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला

या अपघातात एकजण होरपळून त्याचा मृत्यू झाला तर एका गंभीर

Navi Mumbai News : नवी मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात साचले गुडघाभर पाणी

नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे.

तुर्भे येथील म्यापको मार्केट परिसर जलमय झाले. तुर्भे विभागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे.

रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांची दमछाक होत आहे.

Mumbai News : हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसाचा फटका तिन्ही रेल्वेला बसला आहे. अंधरी सबवे पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे हिंदमाता परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai News : मुंबईतील गांधी रुग्णालयातील सिलिंगचा काही भाग कोसळला

मुंबईच्या परळमधील गांधी रुग्णालयात सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास काही भाग कोसळल्याची माहिती मिळत आहे. तिसऱ्या मजल्यावरील 38 वाँर्डमध्ये हे सिलिंग कोसळलं आहे. या वॅाडमध्ये 8 रुग्ण उपचार घेत होते. पहाटेच्या वेळी रुग्ण झोपेत असताना वॅाडमधील हे सिलिंग कोसळलं. सुदैवानं यात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

Maharashtra News Live Updates: निलेश राणे उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

VIDEO : कुर्ला, चुनाभट्टीमध्ये भाजपला धक्का; 1 हजार कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Sharp Eyes: तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

SCROLL FOR NEXT