घाटकोपरमधील असल्फा येथे काही युवक तलवारी घेऊन फिरत असण्याचा सीसीटीव्ही समोर
सकाळच्या सुमारास दोन युवक हातात तलवारी घेऊन असल्फा विभागात फिरत
किरकोळ वादावरून समोर आला, मारण्यासाठी तलवारी घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ समोर
आरोपी अद्यापही फरार असून घाटकोपर पोलीस घेत आहेत शोध
पुणे नाशिक महामार्गावर पेठजवळ रस्त्यावर पांढरे पट्टे मारणाऱ्या कामगारांना त्यांच्या पिकअप गाडीसह ट्रकने जोरदार धडक देत उडवले. यामध्ये चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात गुड लक चौकात असणाऱ्या कलाकार कट्ट्याला आमदार रोहित पवार यांची भेट ...
गेले काही दिवसापासून गुडलक चौकातील कलाकार कट्टा काढण्यात यावा यासाठी पत्र महापालिकेला दिल्यामुळे त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला विभाग लढत आहे
आज रोहित पवार यांनी कलाकार कट्ट्याला भेट देत कलाकार कट्टर हवा यासाठी मागणी केली
- शेतकऱ्यांची संपूर्ण निराशा करणारा अर्थसंकल्प आहे, काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांची प्रतिक्रिया
- रोजगाराची कुठलीही निर्मिती न दाखवणारा, लाडक्या बहिणीच्या मानधनात कुठलीही वाढ न करणारा अर्थसंकल्प
- आजचा अर्थसंकल्प हा शहरी मतदारांना खुश करणारा
भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांचे प्रतिक्रिया
- 'बोले तैसा चाले' प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे
- या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते व सर्व बाबतीत तरतूद करण्यात आली आहे.
- सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणमध्ये दरवर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ठाणे, कल्याण आणि भिवंडी परिसरात निघणाऱ्या शिवजयंती मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते.यंदा कल्याण पश्चिमेतील रामबाग शाखेकडून ‘एपस्टीन फाईल्स’ संदर्भातील देखावा साकारण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते विजय साळवी उर्फ बंड्या साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या United States Department of Justice कडून जाहीर झालेल्या कथित एपस्टीन फाईल्समध्ये काही भारतीय व्यक्तींचा उल्लेख असल्याचा मुद्दा या देखाव्यात मांडण्यात आला आहे
मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लुट केल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर टोलवे ते सावळदे गावात दरम्यान घडली आहे, मध्यप्रदेश राज्यातून मुंबईकडे लसून घेऊन जाणाऱ्या पिकअपची लुट करण्यात आली आहे, महामार्गावर हात दाखवून लसुनने भरलेला पिकअप थांबवून ही लुट करण्यात आली आहे,
महाविद्यालयाच्या बाहेर मुलींकडे बघून करत असे अश्लील कृत्य
भाजप महिला नगरसेविकेने दिली पोलिसात तक्रार
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक
महाविद्यालयाच्या बाहेर वाहनात बसून मुलींकडे बघून प्रताप करण्याची या आरोपीची दुसरी वेळ
प्रणव केदार वझे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव
आरोपी वझे याचे वडील पुणे महापालिकेत कार्यरत आहेत
वाशिमच्या कारंजा शहरातील खाटीकपुरा परिसरात राहणाऱ्या दुर्गेश सुभाष माहोरे या ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह शहरालगतच्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दुर्गेश माहोरे हा गुरुवार पासून घरून निघून गेला होता. त्यानंतर शोधाशोध केली असता आढळून आले नाही. त्यांचा शोध सुरू असताना आज दुपारी ड्रीमलँड सिटी परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
या स्फोटात ४ ते ५ कामगार आगीत होरपळल्याची प्राथमिक माहिती
जखमी कामगारांना तातडीने लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून पुढील मदत व बचावकार्य सुरू
रोहित पवार सीआयडीच्या कार्यालयात दाखल.
सर्व कार्यकर्त्यांना आत घेण्यास सीआयडी अधिकाऱ्यांची मनाई..
रोहित पवारांसह फक्त सात जणांना सीआयडी कार्यालयात आतमध्ये घेतले....
रोहित पवारांचे कार्यकर्ते रविकांत वर्पे आणि CID च्या जाण्यावरून अधिकाऱ्यांमध्ये वादावादी
:धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड आज निवड पार पडली आठ पैकी तब्बल सहा पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती निवडून आला. तर दोन पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला. उमरग्यात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले हिच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. तर धाराशिव पंचायत समितीवर गोकर्णा गोपाळ कदम यांना भाजपकडून सभापती पद मिळाले. समसमान सदस्य संख्या असलेल्या कळंब पंचायत समितीवर ईश्वर चिट्ठीने शिवसेनेच्या खात्यात सभापती पद आलं.भूम परंडा वाशी मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात तीन शिवसेनेचे सभापती निवडून आले. सभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज्य सरकारने आज कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीने आम्ही समाधानी नाही.
विधानसभा निवडणुका होऊन दीड वर्ष झाले आणि आता सरकारला जाग आली तेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे.
फक्त दोन लाखापर्यंत नको तर पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचं माफ व्हायला पाहिजे.
कर्जमाफीसाठी कुठल्याही जाचक अटी व निकष नको सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे.
सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे म्हणजे पुढील कर्जमाफी करण्याची वेळच येणार नाही.
ही कर्जमाफी म्हणजे फक्त "सलाईन " आहे यातून शेतकरी उभा राहू शकत नाही.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा अनुदान जाहीर करायला हवा होता अशी आमची मागणी आहे
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
‘महाविस्तार - एआय’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत पिकानुसार सल्ला, अचूक हवामान अंदाज, किड व रोग व्यवस्थापन तसेच बाजारभाव आणि बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
आदिवासी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत देहवाली भिल्लीसह इतर आदिवासी भाषांचा समावेश करण्यात येणार असून स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वसुधा’ या दूरध्वनी सेवेद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन नागपूर -व्यापार आणि वित्तीय केंद्र
नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणार
नागपूर शहराच्या विस्तार आणि विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडला मान्यता
शाश्वत स्तंभ : शाश्वत शहरे, सक्षम परिवहन-लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि सुयोग्य जलव्यवस्थापन
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी रस्ते विकास.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
टप्पा-1 मंजूर 30,000+ किमी कामांपैकी 97% हून अधिक कामे पूर्ण. उर्वरित कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण होणार
टप्पा - 2 2450 किमी रस्त्यांची कामे पूर्ण
टप्पा - 3 23,000 किमी रस्ते व पुलांची कामे घोषित
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
भाग 1 व 2 मध्ये 99% कामे (26,758 किमी रस्ते व 782 पूल) पूर्ण
भाग 3 मध्ये 6331 किमी (993 रस्ते) कामांपैकी 5086 किमी (673 रस्ते) कामे पूर्ण, उर्वरित कामे प्रगतीपथावर
भाग 4 मध्ये आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील वाड्या-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार
शेतपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे जलदगतीने करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना राबवविणार.
नाशिक इथं रामकाल पथ विकास प्रकल्प
राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगाव, रामटेक (नागपूर) इथं विकसित करणार
रामटेक (नागपूर) इथं रामसृष्टी आणि कालिदास सृष्टी उभारली जाणार
महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार
अहिल्याबाई शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी जे नियमित कर्जफेड करतात ५० हजार प्रोत्साहन लाभ दिला जाईल. - मुख्यमंत्री
राज्याचा कृषी GDP सन २०४७ पर्यंत ५५ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प.
शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी उभारली जाणार. तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा उपक्रम राबवला जाणार.
पशुजन्य आणि मत्स्य उत्पादनात भरीव वाढ आणि रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरु करणार
राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधन उत्पादनात स्वयंपूर्णता गाठणार
पशुसंवर्धन क्षेत्रातील महिला सेवक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार
मत्स्य व्यावसायिकांच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दरवीं ₹1240 कोटींची तरतूद असणारी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबवणार
१ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.
बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून १० ते १५ ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल.३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहेत.
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.
हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पूर्ण होत आहेत. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील.माझं अंतःकरण जड झाल आहे.अजित दादा यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहीली .
त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारल जाईल.नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल.
महात्मा फुले यांच्य्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करणार. संत गाडगे बाबा तीर्थ क्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
माझे मन जड झाले आहे. दीर्घकाळ वित्त खाते सांभाळणारे अजित पवार आज नाहीत. ११ वेळा बजेट अजित दादांनी मांडला…अजित दादांचे स्मारक आणि गतीमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाईल. अजित दादांना अर्थसंकल्प समर्पित करतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करीत आहेत... विधानसभेत अजितदादा अमर रहेच्या घोषणा
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांना पैशांची मागणी केली जात असल्याची गंभीर तक्रार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाला करण्यात असून, ती निनावी आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने चंद्रपुरात येऊन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याची चौकशी करून बयान नोंदवले. आरोग्य विभागाने औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार केला असून, आकाश आत्राम या कर्मचाऱ्याने शासनाची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी आकाश आत्रामच्या माध्यमातून कंत्राटदारांना बिलाच्या बदल्यात अतिरिक्त पैसे मागितले. आत्राम यांची बदली झालेली असतानाही त्यांना चंद्रपुरातील औषध भंडारात बसवण्यात आले, असेही तक्रारीत नमूद आहे. सदर बातमीदाराने औषध भांडारास भेट दिली असता आत्राम तिथेच बसून असल्याचे दिसून आले. मला साहेबांनी इथे कामासाठी बोलावल्याचे त्याने सांगितले. मी कोणत्याही कंत्राटदाराला पैशांसाठी फोन केले नाही, असे स्पष्टीकरण त्याने दिले.
जळगाव उन्हाचा तडाखा वाढू जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश
माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आदेश काढले असून सीबीएसई वगळता सर्व इंग्रजी माध्यमांनाही आदेश लागू
उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून आणि विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून हा मधला मार्ग काढण्यात आला आहे.
अमरावती-
अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान संघटनेला सत्तेत सम समान वाटा
स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड.....
अमरावती महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाबी राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाकडे.....
नवनियुक्त स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचे नगरसेवकातर्फे स्वागत
याआधी महापौर पद भाजपला, उपमहापौर पद रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेला
16 सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे पाच नगरसेवक, युवा स्वाभिमान संघटनेचे तीन, राष्ट्रवादीचे दोन असे एकूण महायुतीचे 10 नगरसेवक....
पुणे -
पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड जाहीर
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी फोडले बंद पाकिट
अजित पवारांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच गटनेत्याची निवड झाली
पुणे जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेल आहे
18 मार्चला पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटनेची निवड करण्यात आली..
बीड जिल्ह्यात कॉप्यांचा सुळसुळाट पहिल्याच पेपर पासून सुरू झाला आहे बोर्डाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक सेंटर वरती सीसीटीव्ही फुटेज बसवले मात्र ते सीसीटीव्ही फुटेज लाईटचा बहाना करत बंद केले जात आहेत बीडच्या बऱ्याच सेंटर वरती दहावीचा आज गणिताचा पेपर असून त्या गणिताच्या पेपरला थेट शिक्षक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी पुरवण्यात आली आहे मास कॉफीचा प्रकार समोर आला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च.
डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत..
कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना
कोल्हापुरात सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावून देण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपसरपंच आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिंगणापूर येथील ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच यांनी मिळून सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी दहा हजारांपैकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना इरफान सनदी आणि दीपक कांबळे या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींच्या घरांची झाडाझडतीही घेतली. या तपासादरम्यान बांधकाम कामगारांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
वी के सिंग यांना सी आय डी कडून खास पाहुणचार?
चौकशीदरम्यान सी आय डी अधिकाऱ्यांसोबत क्रिकेट मॅच बघत असल्याच्या चर्चा
व्हीएसआर कंपनीच्या मालकांची शाही बडदास्त ठेवल्याप्रकरणी रोहित पवार आक्रमक
सकाळी ११ वाजता सुरू झालेली चौकशी संध्याकाळी ७.३० वाजता संपली
संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याच्या काही भाग सिंग यांनी सी आय डी अधिकाऱ्यांसोबत बघितल्याची चर्चा
चार वाजता सीआयडी मुख्यालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोहित पवार विचारणार जाब
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप वसंत मोरे यांच्या विरोधात करत करण्यात आला गुन्हा दाखल
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी दिलासा मिळावा या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन उपलब्ध झाली आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र इमारतीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज अशी एमआरआय मशीन गेल्या आठ महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे, मात्र केवळ तांत्रिक अडचणी सांगत शासकीय प्रक्रियेत या मशीनचे लोकार्पण अडकले आहे.. आजही तपासणीसाठी मशीन पूर्णपणे सज्ज आहे, केवळ शासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागतोय.. या संदर्भात आता नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, येत्या आठ दिवसात एमआरआय युनिट सुरू न झाल्यास या युनिटचा ताबा घेऊन, खाजगी तंत्रज्ञामार्फत सर्वसामान्य रुग्णांसाठी हे एमआरआय युनिट मोफत सुरू करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमोल रिंढे यांनी दिला आहे... बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचे होमटाऊन आहे, तरी देखील आठ महिने उलटून एमआरआय सेंटर सुरू न होणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे...
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी लवकर ईडीच्या पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या सुमारे १५ पथकांनी १० ते १२ ठिकाणी ही कारवाई सुरू केली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांच्या ठिकाणी ही तपासणी केली जात आहे.
या छापेमारीदरम्यान आर्थिक व्यवहार आणि संभाव्य अनियमिततेबाबत कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.
अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीच्या वेळेस घुसून कागदपत्र हाताळणाऱ्या दोन भामट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं होतं. त्यांच्यावर कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल तडवी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी ठाणे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. ग्रामविकास आधिकारी कैलास ऐगडे यांनी शंकर सौदागर बामणे आणि सचिन हरिदास मेहत्रे याच्या नावे कोणतेही शासकीय आदेश नसताना सुट्टीच्या दिवशी चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात अनाधिकृतपणे प्रवेश करण्यास परवानगी दिली. या आरोपींनी शासकिय दस्तऐवजांची हाताळणी केली. चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक प्रकरणं सुप्रीम कोर्टात असताना अशा प्रकारे कागदपत्रांचं वर्गीकरण करून ती गहाळ करण्याच्या हेतूने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून झालेली परस्पर बेकायदेशीर पडताळणी ही गंभीर बाब असून याप्रकरणी कैलास ऐगडे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार धनाजी ईरमाळी यांनी केलीय.
रोहित पवार आज सी आय डी कार्यालयात येणार
वी के सिंग यांच्या झालेल्या चौकशीनंतर आज रोहित पवार सी आय डी कार्यालयात येणार
सी आय डी अधिकाऱ्यांच्या विरोधात रोहित पवार यांनी केली होती पोस्ट
संध्याकाळी ४ वाजता रोहित पवार घेणार अधिकाऱ्यांची भेट
संपुर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी असलेले
गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे,विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे.यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेते पदी विक्रांत जाधव यांची निवड
उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव
विक्रांत जाधव यांच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद गटातून चार उमेदवार झाले होते विजयी
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव झाले होते विजयी
विक्रांत जाधव यांना जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाचा 78 वा वर्धापन दिन आज जालन्यात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्य राखीव दलाच्या मैदानावर आयोजित केलेल्या विशेष संचलनाने आणि थरारक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.दरम्यान जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मदत कार्यात राज्य राखीव दलाने महत्वाची भूमिका बजवल्याचं जालना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलय.
पालघर_मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूच्या महालक्ष्मी उड्डाणपुलावर मध्यरात्री कारचा भीषण अपघात. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या कारने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे ट्रक चालकाने अचानक ब्रेक घेतल्याने हा अपघात झाल्याची माहिती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून कारमधील प्रवासी किरकोळ जखमी. अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करून वाहतूक केली सुरळीत.
लातूर जिल्ह्यातील वाढत चाललेल्या अवैध धंद्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे, लातूरच्या मुरुड परिसरात अवैद्य धंदे, अवैध दारू विक्री यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे., या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीसह 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेल्या पुण्यातील प्रकल्पांची देण्यासाठी गडकरी यांची पत्रकार परिषद
दुपारी १.३० वाजता नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद
पुणेकरांच्या सोयीसाठी कुठले नवे प्रकल्प केंद्र सरकार करणार याकडे सर्वांची उत्सुकता
धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावात सुरू असलेल्या रेल्वे कामामुळे स्थानिक नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात युवा सेनेचे तालुका प्रमुख राकेश हनुमंत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रेल्वे मार्गाच्या कामा दरम्यान मोठ्या प्रमाणावर करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.ब्लास्टिंगच्या तीव्र आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गावातील निवासी भागालगत हे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच घरांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसत असल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.त्यामुळे रेल्वे कामादरम्यान सुरू असलेले ब्लास्टिंग तात्काळ बंद करावे आणि नागरिकांच्या नुकसानीची भरपाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांकडे ७०० ते ८०० जणांनी अर्ज करत लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार या नगरसेवक पदासाठी आयुक्त यांनी पक्षीय बलाबलानुसार पक्षातील गट नेत्यांशी चर्चा करून नावे स्वीकारायची असतात
त्यामुळे आलेल्या एवढ्या अर्जांचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे
राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी प्रशासनाने चार जणांची समिती नेमली आहे
त्यामुळे या समितीला आता कोणाचे अर्ज वैध आणि कोणाचे अवैध हे ठरवावे लागणार असल्याने याचा तिढा वाढण्याची शक्यता
पुणे महापालिकेत यंदा 10 स्वीकृत नगरसेवक असणारा असून पक्षीय बलाबलानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर काँग्रेसचा १ स्वीकृत नगरसेवक असेल
दुबईत अडकलेले 128 नागरिक पुण्यात सुखरूप परतले
पुणे जिल्हा प्रशासनाकडे २५० नागरिक अडकल्याची माहिती असून त्यापैकी १२८ नागरिक परतले
पुण्यासह देशभरातील अनेक ठिकाणाहून दुबई मध्ये गेलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी विशेष विमानांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याची माहिती
शहरातील अनधिकृत होर्डिंग धारकांवर पालिका आयुक्त कडून मोठी कारवाई
आठ लाख 57 हजाराचा दंड अनाधिकृत होर्डिंग धारकाकडून वसूल करण्यात आला आहे
फेब्रुवारीमध्ये अनाधिकृत 17 होर्डिंग 1295 बोर्ड बॅनर फ्लेक्स 313 झेंडे हटवण्यात आले
पोस्टरबाजी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत
21 जणांविरुद्ध कारवाईबाबत विविध पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करण्यात आला आहे
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची अमरावतीच्या मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची पायदळ पदयात्रा सुरू आहे, आज त्यांच्या पायदळ पदयात्राचा सहावा दिवस आहे, आतापर्यंत बच्चू कडू यांनी तब्बल 180 किलोमीटरचा प्रवास केला आहे. काल सायंकाळी बच्चू कडू यांच्या पायदळ पदयात्रेमध्ये त्यांची पत्नी डॉक्टर नयना कडू, मुलगा देवा सुद्धा सहभागी झाला आहे,त्यांनी सुद्धा बरेच वेळ पायदळ चालून अंतर कापले... मेळघाटातील मुलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांना 31 जून पूर्वी दिलेल्या सरकारनं कर्जमाफी करु असं दिलेलं आश्वासन ही आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी पायदळ पदयात्रा काढली आहे, मेळघाट मधील आदिवासी बांधव सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने पायदळ चालून त्यांच्या पदयात्रा पाठिंबा देत आहे...9 तारखेला सलोना ते चिखलदरा असा बच्चू कडू यांचा विराट असा मोर्चा असणार आहे
शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल
लक्ष्मी रस्ता- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात आणि आसपासच्या मार्गांवर सकाळी सात वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार
लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील एम.जी. रस्ता आणि ईस्ट स्ट्रीट परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार
अजितदादांच्या मृत्यूनंतर पहिलाच अर्थसंकल्प
अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वांचेच लक्ष
चिपळूणमधील डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी केलीय या अकॅडमीला एकुण 13 पदकं मिळालीत. डेरवण युथ गेम्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून 200 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
मोची समाजाच्या कन्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापुरात मोची समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून जोरदार जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. गरीब घरातून पुढे आलेल्या ज्योती वाघमारेंच्या निवडीमुळे समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे समाजाकडून आभार मानण्यात आले. तसेच ही निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिका रेस्क्यू
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.
सांगलीच्या भिलवडी येथील मौटी रस्त्यालगत असलेल्या संग्राम केन ॲग्रो कारखान्याजवळ आज सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग सुमारे आठ ते दहा एकर परिसरात पसरल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळताना दिसत होत्या. यावेळी कारखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले.
दरम्यान, चितळे डेअरीच्या अग्निशामन दलाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यांच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. या सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे शेतकरी रवींद्र माने यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पीक वाचवण्यात यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.