Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: धुळ्यात शिख समाजाचं पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६, महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

धुळ्यात शिख समाजाचं पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन

धुळ्यातील शिख समाज बांधवांचे धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन...

महिलांचं मोठ्या प्रमाणात शीख समाज बांधव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून...

गेल्या दोन तासांपासून सुरू आहे आंदोलन...

धुळे गुरुद्वाराला कुलूप लावल्याच्या मुद्द्यावरून शिख समाज बांधव संतप्त...

धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धिरजसिंग खालसा यांची गुरुद्वारात झाली होती हत्या...

बोरिवलीत ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने 

मनसेच्या बोरिवली पूर्व येथील शाखेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना. शिंदेंच्या सेनेची प्रचार रॅली आल्याने दोन्ही कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा...

उद्धव ठाकरे गाडीत जात असताना मनसे, ठाकरेंची सेना विरुद्ध भाजपा आणि शिंदेंची सेना यांच्या कार्यकर्त्यांनी दिला घोषणा

आजचा वचननामा नव्हता, वाचूननामा होता - देवेंद्र फडणवीस 

रश्मी ठाकरे शिवडीमध्ये, उमेदवाराच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार

मुंबई वॉर्ड क्रमांक 206 शिवडी चे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन पडवळ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार कार्यालयाचे तसेच कार्याहवाल आणि प्रचार रथ याचे करणार उद्घाटन

रश्मी ठाकरे या शिवडीमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात जाहीर सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा

प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी पाषाण सुस म्हाळूंगे भागातील उमेदवारासाठी अजित पवार मैदानात

अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, गायत्री मेढे आणि पार्वती निम्हण यांच्या प्रचारार्थ होत आहे अजित पवार यांची सभा

Navneet Rana : मर्यादा ओलांडू नका; नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला

मर्यादेत राहून बोलायला शिका

नवनीत राणांवर आमदार संजय खोडके यांचा घणाघाती प्रहार

अमरावतीत नवनीत राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यात जुंपली

Mumbai Fire : बोरीवलीतील एक्सर गावात भीषण आगीची घटना

बोरीवलीतील एक्सर गावातील एका बंद घराला अचानक आग लागून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मनसेचे शाखाध्यक्ष विजय पाटील, शिवसेना (उबाठा)चे शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र गावकरी तसेच शिवसेना–मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली. प्रसंगावधान राखल्यामुळे आजूबाजूची घरे वाचली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जेजुरीत भरला गाढवांचा बाजार

जेजुरीत गाढवांचा बाजार भरलाय. बाजारात राज्यभरातून नव्हे तर पर राज्यातून गाढवे विक्रीसाठी गाढवे आणण्यात आली आहे. राजस्थानातील काठेवाडी जातीच्या गाढवाला विक्रमी म्हणजेच दीड लाखाची किंमत मिळाली.

मंत्री दादा भुसे यांची नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा

- मंत्री दादा भुसे यांची नाशिकमध्ये महापालिकेच्या प्रचारार्थ पहिली जाहीर सभा

- शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचा मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भाजपच्या नेत्याची बैठक

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज परभणीत भाजपनेते तथा परभणी शहरातील सर्व उमेदवारांची बैठक घेतली आहे शहरातील कार्निवल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये महायुती सरकारने केलेले काम हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले

राणे समर्थकांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन

- खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत... भाजपा व शिंदे सेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केले जोरदार शक्ती प्रदर्शन... नगरपंचायत निवडणुकीनंतर नारायण राणे आलेत सिंधुदुर्गात.. एकच नारा अशा आशयाचे जिल्ह्यात लागले बॅनर.. हजारो गाड्यांसह गोवा बॉर्डर पासून कणकवली पर्यंत निघाली भव्य रॅली.. राणेंचं सिंधुदुर्गात जोरदार शक्ती प्रदर्शन... मंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या समवेत हजारो कार्यकर्त्यांनी केले नारायण राणेंचे स्वागत... कणकवली येथे जाहीर सभेत नारायण राणे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

वणीत शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची तुफान गर्दी

यवतमाळच्या वणीत शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भव्य महाएल्गार शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात लाखो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.प्रहारचे बच्चू कडू यांनी कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावावर कृषी व्यस्थेला संवैधानिक दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टिका देखील केली.

भुसावळ रेल्वे स्टेशन जवळ कारला अचानक आग, वाहन जळून खाक

जळगावच्या भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज अचानक एका कारला आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुस्लिम शरद पवारांच्या नादी लागले म्हणजे दाऊदच्या नादी लागेल-प्रकाश आंबेडकर

भारतीय जनता पार्टीने छोट्या समाजातील लोकांना तिकीट दिलेली नाही काँग्रेसकडे फक्त मुस्लिम मतदार आहे आणि तोही आता राहिलेला नाहीये इतक्या दिवस मुस्लिम समाज शरद पवारांच्या नादी लागला होता

मावळच्या देहूरोड मध्ये 21 किलो गांजासह, दोघे गजाआड

मावळच्या देहूरोड परिसरात अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यवहाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असतानाच गुन्हे शाखेच्या विरोधी पथकाने कारवाई करत गांजा जप्त केला आहे.. मामुर्डी येथील एका नामांकित रहिवाशी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गांजाचा व्यवहार सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत दोन तरुणांना ताब्यात घेतले. ओमकार हरी इंगवले आणि सुभाष राजेंद्र भट अशा दोन आरोपींना अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या कारवाईक 21 किलो 32 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार सुमारे चार लाख पाच हजार रुपये किंमत आहे. याप्रकरणी देऊरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अधिक तपास देऊन पोलीस करीत आहे.

विंचूर-प्रकाशा महामार्गावर सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको

सकल हिंदू समाजाच लासलगाव येथून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील श्रीराम चौकात रस्ता रोको,कोल्हापूर येथे महापुरुषांचा फोटो असलेल्या बॅनरची झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ केला रास्ता रोको

आपलं राज्य कुठे नेवून ठेवलं आहे - अमित ठाकरे

मनसे नेते अमित ठाकरे हे बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात सरवदे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले आहेत

या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांबद्दल मत व्यक्त केलं

यावेळी बोलताना त्यांनी आपलं राज्य कुठे नेवून ठेवलं आहे? बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येबाबत फडणवीसांना भेटणार असल्याचं म्हटलं

महाराष्ट्रात युपी बिहारसारखा पायंडा पाडला जातोय - राज ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंगालमध्ये बिनविरोध झाल्या होत्या. त्यावेळी भाजप कोर्टात गेला होता. तुम्हाला बंगालमध्ये चालत नाही अन् महाराष्ट्रात चालतेय. सत्तेचा आमरपट्टा घेऊन आला नाहीत. आज तुम्ही सत्तेत आला, त्यावेळी काँग्रेसने असं केलं तसं केले तुम्ही सांगता. ज्यावेळी तुम्ही सत्तेतून बाहेर गेल्यावर त्यानंतर येणाऱ्यांनी काही काही बोलले जाईल, त्यावेळी काही बोलू नका. आपण करत असलेली कृती एखादा पायंडा पाडत नाही, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे राज ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जसं राजकारण केले जाते, तसे महाराष्ट्रात केले जातेय. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. महाराष्ट्र हा संस्कृत आहे. तुम्ही महाराष्ट्रात युपी बिहारसारखा पायंडा पाडला जातोय, असेही राज ठाकरे म्हणाले.

राहुल नार्वेकरांना पदावरून निलंबित करा - उद्धव ठाकरे

राज्यात २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणुका होणार आहेत

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूनी एकत्र येत वचन नामाचं उदघाटन केलं

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर टीका करत राहुल नार्वेकरांना पदावरून निलंबित करा असं म्हटलं आहे.

देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाली आहे - उद्धव ठाकरे

राज्यात २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणुका होणार आहेत

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूनी एकत्र येत वचन नामाचं उदघाटन केलं

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर टीका करत देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाली असल्याचं म्हटलं

संयुक्त वचन नामाचं ठाकरे बंधूंच्या हस्ते उदघाटन

राज्यात २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणुका होणार आहेत

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूनी एकत्र येत वचन नामाचं उदघाटन केलं

राज ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

- रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नाशिकपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

- नाशिकमधून फोडणार महापालिका निवडणुकांचा प्रचाराचा नारळ

- नाशिकच्या श्रद्धा लॉन्समध्ये भाजपचा विजयी संकल्प मेळावा

महाविकास आघाडीच्या रायगडमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

महाविकास आघाडीच्या रायगडमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा अलिबाग येथे सत्कार करण्यात आला. आगामी काळात जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे, शेकाप आघाडीतील घटक पक्षांचा योग्य सन्मान करेल, असं शेकाप नेते जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा गौरव करण्यात आला. काँग्रेस नेते भाई जगताप यावेळी उपस्थित होते.

सांगली.. शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार शुभारंभ मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न

सांगली महापालिका निवडणुकी मध्ये आज शिवसेना शिंदे गटाकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सांगलीच्या आराध्य दैवत गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

मी गणपतीचा भक्त आहे त्यामुळे आज सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा शुभारंभ सांगलीच्या आराध्य दैवत गणपती रायाच्या नतमस्तकी होऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे आमच्या पॅनेलच्या पाठीमागे गणपती राया उभे राहील असे मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे सेनाभवानत दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. मुंबईकरांसाठी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे.

खोपोली हत्याकांड प्रकरणी मोठी माहिती उघड

खोपोली येथील मंगेश काळोखे हत्यांकांड प्रकरणी प्रेसनोट काढत रायगड पोलिसांनी मोठी माहिती उघड केली आहे. वैयक्तीक आणि राजकिय वैमनस्यातुन काळोखेंची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. यासाठी देवकर यांनी 20 लाख रुपयांची सुपारी ईशा शेख या महिले मार्फत आदिल शेख, खादिल कुरेश आणि एक मारेकरी अशा तीघांना दिली होती अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विषाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पवार, ओंकर मगर, सचिन चव्हाण, ईशा शेख, आदिल शेख, खादिल कुरेश अशा 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर या हल्ल्यातील आणखी एक मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच बरोबर फिर्यादीमध्ये आरोप असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा कटात सहभागी असल्या प्रकरणी तपास सुरु आहे. अशी माहिती रायगडच्या पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.

अमरावतीमध्ये असा असणार फडवणीसांचा अमरावती मधील रोड शो.

पंचवटी चौक येथून सुरवात.

शेगाव नाका चौक

नवीन कॉटन मार्केट.

चौधरी चौक.

आदर्श हॉटेल.

जयस्तंभ चौक.

राजकमल चौक,

गांधी चौक.

शिलांगण रोड.

नवीन बियाणी चौक.

साईनगर आणि साई मंदिर या भागातून जाणार फडणवीस यांचा रोड शो..

अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार

आधी उमेदवारांसाठी इच्छुकांचा आक्रोश पाहायला मिळाला, तर आता मतदारांचा मूलभूत सुविधांसाठी आक्रोश दिसून येत आहे.. अकोला महापालिकेतल्या प्रभाग 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदारांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.. शिवणी भागातील बहुजन नगरातल्या नागरिकांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.. 'मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार' असे बॅनर देखील परिसरात लावण्यात आले आहेत.. बहुजन नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांकडं लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत इथल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय..

कल्याणमध्ये पैशासाठी सुनेचा खून,मुलाच्या ग्रॅच्युएटीसाठी सासूनेच रचला हत्या कट,

कल्याण शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली असून, वालधुनी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या मृतदेहामागे कौटुंबिक संपत्तीचा वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला अंदाजे ३५ वर्षांच्या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा होत्या. रुक्मिणीबाई रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल

हत्येचे आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून मृत बाळासाहेब सरवदे यांच्या परिवाराविरोधात तक्रार

सरवदे कुटुंबातील सदस्यांनी हातात तलवार, कोयता, काठ्या घेऊन घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप

बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरवदे याची पोलिसांत फिर्याद

अंबादास दानवे यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव उघड केले

घाटी हॉस्पिटलचे डीन शिवाजी सुक्रे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना धमकी देत असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप

एक्स वर अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाला दिले पत्र टाकून मंत्राच्या आदेशानुसार कोण अधिकारी आमच्या उमेदवाराला त्रास देतोय हे सांगितले

लातूरमध्ये तोडणी हार्वेस्टर मध्ये आणखीन एकाचा बळी

लातूरच्या निलंगा तालुक्यातील झरी शिवारात हार्वेस्टर मशीन मध्ये 28 वर्षीय ऑपरेटरने आपला जीव गमावला आहे,शेतातील तुरीची रास केल्यानंतर मशीनचे साफसफाई करताना सचिन धीम्मान वय 28 हा राहणार मूळचा उत्तर प्रदेशातील असून याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आठ दिवसांपूर्वी औसा तालुक्यातल्या आशिव येथे शेतकऱ्याचा हार्वेस्टर मध्ये अडकून मृत्यू झाला होता, नंतर आज पुन्हा हार्वेस्टर ऑपरेटर चा मृत्यू झाल्याने परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येते आहे..

भावी नगरसेवक लागणार आजपासून जोमाने प्रचाराला, प्रचार रथ, बॅनर आदी तयारी अंतिम टप्प्यात

राज्यभरातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे सर्वत्र लढती स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला हे सर्व उमेदवार आणि नेते लागणार आहेत दरम्यान याच प्रचारासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रचार रथ तसेच एलईडी व्हेन कट आउट आदी तयार करण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे.परभणीतील 16 प्रभागातील 65 नगर सेवक पदासाठी 411 उमेदवार रिंगणात आहेत आणि परभणीतील प्रचार रथ आजपासून प्रचार करणार आहेत थोड्यावेळात हे सर्व रथ तयार होऊन प्रभागात फिरणार आहेत हनेमकी कशी तयारी सुरू आहे सर्वच पक्षाच्या या प्रचाराची याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी

सीएनजी गॅसचा टँकर पलटला, सुदैवाने जीवितहानी टळली...गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा मार्गावर

गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा मार्गावर मोठी दुर्घटना घडता-घडता टळली आहे. मुरडोली जंगल परिसरातील बाघदेव मंदिराजवळ रिलायन्स कंपनीचा सीएनजी गॅसचा टँकर अचानक पलटला. सुदैवाने हा टँकर रिकामा असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याने गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने काही काळासाठी गोंदिया–कोहमारा मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती.

शेगाव रेल्वे स्थानकावर रवी इंगळे यांनी रेखाटली २० फूट उंच संत गजानन महाराजांची भव्य पेंटिंग...

शेगाव रेल्वे स्थानकावर स्थानिक कलाकार रवी इंगळे यांनी तब्बल २० फूट उंच संत गजानन महाराजांची भव्य पेंटिंग साकारून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना सहज दर्शन घडावे आणि संत गजानन महाराजांचा आशीर्वाद लाभावा या उद्देशाने ही कलाकृती साकारण्यात आली आहे....ही पेंटिंग पूर्णपणे हाताने रंगवून तयार करण्यात आली असून ती पूर्ण करण्यासाठी सलग दोन महिन्यांचा कालावधी लागला. विविध रंगछटांचा वापर करून संत गजानन महाराजांचे मुखवटा रूप अतिशय जिवंत आणि भावपूर्ण पद्धतीने साकारण्यात आले आहे. त्यांच्या मुखावरील तेज, करुण भाव आणि आशीर्वाद देणारी मुद्रा पाहून भाविक भारावून जात आहेत...या भव्य पेंटिंगमुळे शेगाव रेल्वे स्थानकाचे सौंदर्य अधिक खुलले असून स्थानकात येणारे भाविक आणि प्रवासी थांबून ही कलाकृती पाहत आहेत. रवी इंगळे यांच्या या उत्कृष्ट हस्तकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी साकारलेली ही पेंटिंग भक्ती, कला आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडवत आहे.....

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र

Thackeray Brothers Alliance : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली असून आज शिवसेना भवनात ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा जाहीर होणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात युती करायची का नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम करु

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी धाराशिवमध्ये युती करायची का नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,ते जो निर्णय घेतील त्या प्रमाणे आम्ही काम करू अस वक्तव्य माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांनी केलय.नगरपालिका निवडणूकीत देखील आम्ही युती करायची नाही अस म्हणालो नव्हतो माञ समोरून १० दिवस अगोदरच युती करायची नाही अस म्हणल्यावर आम्ही ही शिवसैनिक आहोत मग आम्हीही आमच्या पध्दतीने एकला चलोरेची भुमीका घेतली आणि यश संपादन करून दाखवले.त्याचप्राणे आता देखील जो पक्ष आदेश येईल त्या प्रमाणेच आम्ही इथ काम करू अस सावंत म्हणाले.जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सावंत यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यासाठी वाशी तालुक्यातील इंदापूर येथे मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Maharashtra Live News Update: पुण्यात प्रचाराचा धुरळा उडणार, राज्यातील बड्या नेत्यांची होणार पुणे वारी

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बड्या नेत्यांच्या पुण्यात होणार सभा

सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यातील येरवडा मध्ये सभा, तर ११ तारखेला फडणवीस यांचा अनोखा "टॉक शो"

शिंदेसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ तारखेला २ सभा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सभासत्राला आजपासून होणार सुरुवात

पुण्यात ४१ प्रभागासाठी १६५ जागांवर होणार मतदान

खासदार सुप्रिया सुळे , काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे यांच्या प्रचारसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा घेणार सभा

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उरले अवघे १० दिवस

सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी चे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कालपासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली

पुणे महापालिका निवडणुकीत 1165 उमेदवार उभे आहेत

प्रचारासाठी दहा दिवस उरल्यामुळे उमेदवारांकडून पदयात्रा, दुचाकी रॅली पत्रक वाटपाचे काम सुरू

यवतमाळ जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य, थंडीपासून दिलासा

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला असला तरी धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे धुक्के आणि ढगाळ वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या जिल्ह्यात 15 सेल्सिअल्स इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.ढगाळ वातावरण असाच राहिल्यास खरिपातील तूर पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तविला जातेय.

शेकापच्या शेतकरी मेळाव्यातून अनिकेत देशमुख यांना इशारा

दोन भावांमधील प्रेम हे अतूट आणि पवित्र असते.त्यामध्ये त्याग आणि समर्पण असते.परंतु जर कोणाचे ऐकून पवित्र नातं अपवित्र करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर यापुढे माझाही नाईलाज आहे, असा इशारा शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचेच बंधू डाॅ.अनिकेत देशमुख यांना दिला आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यातून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अनिकेत देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.

चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार थेट तलावात कोसळली

नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात एक थरारक घटना घडली. भाविकाची कार अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आणि एका स्थानिक तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचवले.गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी चांदपूरला आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना, पार्किंगमधून सॅन्ट्रो कार बाहेर काढत असताना हा अपघात झाला. कार वळवत असताना अचानक एक्सीलेटरवर पाय जोरात दाबला गेल्याने कारचा वेग वाढला आणि ती थेट समोरच्या तलावात जाऊन कोसळली.कार तलावात बुडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेले सिहोरा पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील कासदा,पोलीस शिपाई रवींद्र सव्वालाखे,साहिल कोहळे (वय १७, स्थानिक तरुण)या तिघांनीही क्षणाचाही विलंब न लावता तलावात उड्या घेतल्या. पाण्याचा अंदाज घेत त्यांनी बुडत्या कारपर्यंत पोहत जाऊन चालक श्रीकृष्ण रहांगडाले आणि त्यांचा मुलगा ओम रहांगडाले यांना सुखरूप बाहेर काढले.दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्यानंतर, स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली कार ओढून बाहेर काढण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे.गर्दीच्या वेळी प्रसंगावधान राखून दोघांचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस हवालदार सुनील कासदा, रवींद्र सव्वालाखे आणि तरुण साहिल कोहळे यांचे परिसरातून आणि पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT