Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पीएमपी बसमधील चोरी व महिला विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)च्या बसमध्ये चोरी तसेच महिला विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सुरवसे-पाटील यांनी पीएमपी प्रशासनाकडे निवेदन दिले असून, महिला प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसमधील चोरी किंवा विनयभंगाच्या घटनांतील आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी कठीण ठरत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी अनेक प्रकरणे अनुत्तरित राहतात.

पिंपरी-चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा, १७ ठिकाणी झाडपडी, वाहनांचे मोठे नुकसान.

पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने दाणादाण उडवून दिली. अवघ्या पाच तासांत शहरात १७ ठिकाणी झाडे कोसळली असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लातूर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा ; 1 हजार 345 हेक्टर वरील शेती पिकांना फटका

लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील एकूण 1हजार 345 हेक्टर वरील पिकांना गारपिट आणि अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय., आंबा फळबागेसह द्राक्ष शेतीला देखील गारपिटीने झोडपले आहेत., तात्काळ पंचनामा करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा झाला लाल चिखल...

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकासोबतच फळबाग व भाजीपाला वर्गीय पिक घेण्याकडे वळताना दिसतोय.. मात्र पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.. बुलढाण्याच्या नांद्राकोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांनी आपल्या दोन एकर शेतीपैकी अर्धा एकर क्षेत्रफळामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली, त्यासाठी त्यांना आतापर्यंत जवळपास 50 हजार रुपये खर्च आला, आता टोमॅटो पीक काढणीला आलंय, मात्र योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहिये .. त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे टोमॅटो आता जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे.. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळतय...

उन्हाचा झळा अन् अवकाळीचा घाव; शेळ्या-मेंढ्यांवर दुहेरी संकट

उन्हामुळे चक्कर येऊन आधीच मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचा मृत्यू झाला होता, तर आता अचानक थंडी, गारपीट आणि रोगराईमुळे शेळ्या-मेंढ्यांचा जीव जात आहे. लेकरांसारखं जपलेलं पशुधन डोळ्यांसमोर दगावत असल्याने मेंढपाळ हतबल झालेत उन्हात होरपळ… आणि आता पावसात गारठा.माळरानावर भटकणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांवर दुहेरी संकट कोसळलंय उन्हाच्या तडाख्यात चक्कर येऊन मृत्यू, तर आता गारपीट आणि थंडीने पशुधन दगावत आहे.लेकरांसारखं जपलेलं जनावरं गमावत असल्याने मेंढपाळांच्या डोळ्यात अश्रू आहेत.सरकारकडून तातडीने मदत आणि पशुवैद्यकीय उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतेय.

पिता पुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या निर्दोष

ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याच्या आरोपातून सतीश भोसले उर्फ खोक्या याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले... तर एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे.. परंतु त्यासह इतर प्रकरणात त्याला जामीन मिळालेला असल्याने सतीश भोसले उर्फ खोक्या आता तब्बल वर्षभरानंतर जेल बाहेर आला आहे... आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले हा बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता... त्यानंतर त्याच्यावर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याचा देखील गुन्हा दाखल झाला होता... त्याने सोशल मीडियावर केलेल्या देखील चर्चेत आल्या होत्या... दरम्यान त्याची आता ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणात दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची संभाजीनगर येथील कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

पावसाने पुण्यात महिलेचा घेतला जीव

पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसात सिंहगड रस्त्यावर हृदयद्रावक घटना घडली असून, मंदिराशेजारी फुल विक्री करीत बसलेल्या महिलेच्या अंगावर भलेमोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या मंदिराशेजारी फूल विक्री करीत होत्या. उन्हात-पावसात आसरा देणारे हेच वडाचे झाड आज त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

नागपूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- कुमार आशीर्वाद हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी 22 जुलै 2023 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.

- सोलापूर येथे जवळपास तीन वर्षांची सेवा दिल्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्र्यांच्या होमग्राउंड असलेल्या नागपुरात नियुक्ती करण्यात आली आहे.

- नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कुमार आशीर्वाद हे पदभार स्वीकारणार आहेत.

लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची बदली, डॉ भारत बास्टेवाड हे लातूरचे नवीन जिल्हाधिकारी

लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर लातूर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर भारत बास्टेवाड हे रजू होणार आहेत, ते यापूर्वी नागपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते.

अवकाळीचा घाव; काढणीचा कांदा पाण्यात, शेतकरी उद्ध्वस्त

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं आहे.

काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलंय मोठा खर्च, काबाडकष्ट आणि आशा हि सारी स्वप्न उराशी असताना पण अवकाळी पावसाने सगळं पाण्यात गेलं.शेतात उभा असलेला कांदा अक्षरशः सडू लागलाय.विक्रीच्या उंबरठ्यावरचं पीक नष्ट झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरतेय.

मेट्रोला प्रवाशांचा वाढता पाठिंबा! मार्च महिन्यात 8.96 कोटींची कमाई

मागील काही वर्षात पुणे मेट्रोचा मोठा विस्तार झाला आहे. पुण्यात रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढतेय.

-यंदाच्या मार्च महिन्यात पुणे मेट्रोने तब्बल ८.९६ कोटींची कमाई नोंदवली आहे.

-या महिन्यात मेट्रोने ५७.६९ लाखांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली.

अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुण्यात काल दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत

-सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते.

-दुपारी अडीच ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाडपडीच्या ८२ घटना घडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे होती.

-यासह पाणी साचल्याच्या ६ घटना, तर सीमा भिंत पडल्याची १ घटना घडल्याचा कॉल अग्निशमन विभागाला प्राप्त झाला होता. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

आखाती देशातील युध्दाचा परिणाम, येरमाळा येथील याञेत हॉटेल व्यवसायिकांवर चुली पेटवण्याची वेळ

आखाती देशात सुरू असलेल्या युध्दाचा परिणाम आता धाराशिव मधील प्रसिध्द असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेत देखील पाहायला मिळत आहे.पाच दिवस चालणाऱ्या या याञेसाठी राज्यभरातुन लाखो भाविक येत असतात त्यामुळे हॉटेल व्यावसायिक या याञेत आपला व्यवसाय थाटत असतात मात्र यंदा युध्द परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस वितरण बंद असल्याने व्यवसायिकांना चुली पेटवण्याची वेळ आली आहे.चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा मोठा ञास सहन करावा लागत असुन त्यातच अचनाक अवकाळी पाऊस पडला की मोठी अडचण निर्माण होतेय,लाकडाचे भाव देखील वाढले आहेत त्यामुळे व्यवसायिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.डोळ्यांना ञास होतोय तर धुरामुळे ग्राहक देखील येत नसल्याने मोठा फटका बसत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सी मोठा काळा बाजार उघड

राज्यस्तरीय दक्षता पथकाची गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार येथे आज पहाटे धाड

LPG टॅंकरचे सिल तोडून गॅसची चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आले.

LPG गॅसने भरलेले एच. पी. कंपनीचे टॅंकर क्रमांक MH43 K 5921 मध्ये १७५९० किलो व MH 43CK 5747 मध्ये १७६३० किलो भरलेले कॅप्सूल टॅंकर आढळून आले.

तसेच १९.२ किलो चे १७ भरलेले सिलेंडर व ६ रिकामे सिलेंडर आढळले.

१४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर व ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर आढळून आले.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह पुणे शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. सलग चौथ्या दिवशीही पावसाने दमदार पुनरागमन करत शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले, तर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी गाड्यांचे नुकसान झाले असून झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, बळीराजा संकटात

मागील चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे, सोलापूर, हिंगोलीसह कोकण आणि मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतामधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडलाय. आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

Friday Horoscope: जोडीदारासोबतचे वाद मिटतील, नव्या कामातून पैसा मिळेल; या ५ राशींना लागणार आज लॉटरी

वडील तंत्र-मंत्र करायचे का? भेटायला कोण कोण यायचं? खरातच्या मुलाला SIT ने काय काय प्रश्न विचारले?

SCROLL FOR NEXT