उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजचा बीड दौरा अचानक रद्द झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद निवडणुकांमधील दणदणीत यशानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येणार होते. सकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रमांची मालिकाच नियोजित होती. तब्बल 1 हजार विकासकामांची घोषणा तथा भूमिपूजन शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती उभारण्यात आलेल्या मंडपातून बीडकरांना संबोधित करत ते करणार होते. तसेच सहकार भवनचे भूमिपूजन, टेनिस कोर्टचे उद्घाटन, मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा, औद्योगिक क्षेत्र, वन पर्यटन प्रकल्पांचे सादरीकरण आणि जिल्हा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचा कार्यक्रम होता. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि सशस्त्र ध्वज निधी संकलनातील राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष सोहळाही नियोजित होता. मात्र ऐनवेळी महापालिका निवडणुका आणि कॅबिनेट बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून दोन महिला पदाधिकारी अन्नत्याग आंदोलन करत आहेत
ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांची उमेदवारी रद्द करावी
आमचा पक्षावर राग नाही तर स्थानिक नेत्यावर राग,
वर्षा साळुंके आणि दिव्या मराठे महिलांचे नावे
- नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 122 जागांसाठी तब्बल 2357 उमेदवारांनी भरला अर्ज
- काल उमेदवारी दाखल करण्यासाठी होता शेवटचा दिवस
- महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये शेवटच्या दिवशी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह गर्दी करत भरला उमेदवारी अर्ज
- नाशिक महापालिका निवडणुकीत 2357 उमेदवार रिंगणात
- अर्ज माघारीपर्यंत किती उमेदवार अर्ज माघारी घेतात, याकडे लक्ष
नाशिकच्या सातपूरमधील एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अखेरीस प्रभाग क्रमांक ११ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना आपले प्राधिकृत देण्यात आलेल्या व्यक्तिमार्फत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्याबरोबर त्यांची सून माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी देखील याच प्रभागातून अर्ज दाखल केला आहे. प्रकाश लोंढे यांनी रिपाई आठवले गटाच्या माध्यमातून नगरसेवकपद भूषवले आहे. मागच्या वेळी प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने त्याचा पराभव केला होता. मात्र, सध्याच्या प्रभाग क्रमांक ११ मधून त्याची सून दीक्षा लोंढे यांनी विजय मिळवला होता. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी आयटीआय सिग्नलजवळील एका पबमध्ये गोळीबार प्रकरणी पोलिसांनी प्रकाश लोंढे, मुलगा दीपक लोंढे आणि भूषण लोंढे याच्यासह अनेक सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी या टोळी विरोधात मकोका लागू केला असून सध्या ही टोळी नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध आहे. मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रकाश लोंढे याने इच्छा प्रदर्शित केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम साठे यांच्या मार्फत त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ऐन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या भाजपचे महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जाधव हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. वेगवेगळ्या पदावर त्यानी काम केलं मात्र ऐन वेळेवर उमेदवारी नकारल्याने जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांचा राजीनामा
निवडणूक पूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात आले होते
अजित पवार गटात आल्यानंतर त्यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती
मात्र खरटमल यांनी ऐन निवडणुकीत पक्षाचा आणि निवडणूक प्रमुख पदाचा ही राजीनामा दिलाय
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षचा जल्लोष करतांना कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून जल्लोष करावा असे आवाहन यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले असून रात्री आठ वाजेपासून तर पहाटेपर्यंत शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार आहे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या थेट गुन्हा दाखल होणार आहे.नववर्षाचा आनंद हा कायदा पाळूनच साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दाट धुक्याचा विमान कंपन्यांना फटका
पुणे विमानतळावरून तीन विमाने झाली रद्द
दिल्ली , अमृतसर , आणि लखनौ जाणारी विमान झाली रद्द
दाट धुक्याने धावपट्टी दिसत नसल्याने विमान सेवेवर परिणामन
उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने विमान सेवेला फटका
लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतुकीत केला बदल
मद्यपी चालकाच्या विरोधात होणार कारवाई
महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता राहणार बंद
संध्याकाळी ५ नंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार
एफ सी रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होते त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाचा निर्णय
जालन्यात 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी अवैधरित्या देशी दारूची कारमधून वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय.जालना स्थानिक गुन्हे शाखेने हि कारवाई केली असून या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.जालना - राजुर रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर देशी दारू बाळगून चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास अडीच लाखांचा देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जवळपास १५८ अर्ज भरले शिवसेनेने
अजून ही आमची युती तुटली नाही उदय सामंत यांचा दावा
मात्र पक्षाच्या आदेशानंतरही अनेक जण आहे माघार घेणार नसल्याची माहिती
काल युती तुटल्यावर जवळपास १५८ जणांनी भरले आपले उमेदवारी अर्ज
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी २ हजार २९८ अर्ज दाखल झाले. तर, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.रात्री उशिरापर्यंत दाखल झालेल्या अर्जाची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. या अर्जाची छानणी आज ३१ डिसेंबरला होणार आहे.मंगळवारी एका दिवसात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २ हजार २९८ अर्ज आले. ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाले.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी मांदियाळी कोकणात जमली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी आरटीओ विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मुंबई गोवा महामार्गावर आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेषतः मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.. त्यासाठी आरटीओची विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करा, मात्र रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाची काळजी घ्या. मद्यपान करून वाहन चालवू नका. आनंद साजरा करताना नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा असं आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आलं आहे..
अमरावती महापालिका निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ७१५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत १०२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. २२ प्रभागांत ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी मतमोजणी होणार आहे.अमरावती महापालिका प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात ठिकाणी व्यवस्था केली होती. 2017 मध्ये भाजपमधून 45 नगरसेवक विजयी झाले होते...काँग्रेसचे मागील वेळी 15 नगरसेवक विजयी झाले होते.. त्यापैकी पाच नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले... काँग्रेसकडे यंदा 65 नव्या चेहऱ्यान्या उमेदवारी देण्यात आली आहे
थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा आणि सुव्यस्था बिघडवाल तर तुम्हाला जेल वारी करावी लागणार आहे. रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी तसे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. रात्रीच्या वेळी समुद्र किनारी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची त्यांची छेडछाड होवू नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्यांचीदेखील गस्त राहणार आहे. दारू पिवून गाडी चालवण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. त्यातून अपघात होण्याची भीती असते. हे लक्षात घेवून पर्यटन स्थळी गस्तीवर असणारया पोलीस पथकांकडे ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहाटेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार असून यात दारू पिवून गाडी चालवणारयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
राज्य शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज येथील दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतर गावातील दारूबंदी चळवळ पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. निघोज दारूबंदी समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात थेट कृतीचा इशारा देत गावात जोरदार प्रचारफेरी काढली. परवानाधारक दारू दुकाने बंद असतानाही गावात अवैध मार्गान गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत गावात प्रचारफेरी काढून दारूबंदीचा ठाम संदेश दिला.
पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकच अर्ज
भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध होण्याची शक्यता
18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने जवळपास त्यांची उमेदवारी बिनविरोध झाल्याची माहिती
मात्र कागदपत्र पडताळणी उद्या होणार असून यानंतरच अधिकृत घोषणा
उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. कल्याणमधील मनसेचे उपविभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत थेट नांदीवली परिसरातील मनसे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मनसेच्या स्थानिक संघटनेत खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मंगळवारी नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सहा ठिकाणी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार तसेच त्यांचे समर्थक अर्ज भरण्यासाठी कार्यालयांमध्ये दाखल झाले होते.दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेनंतर दिवसाअखेरीस उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ६९५ नामनिर्देशन अर्ज उमेदवारांकडून सादर करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी चुरस दिसून आली.आता नामनिर्देशन अर्जांची छाननी, त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया आणि निवडणूक चिन्ह निश्चिती झाल्यानंतरच निवडणुकीचा खरा रंग स्पष्टपणे समोर येणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे प्रचार रणधुमाळी सुरू होऊन उल्हासनगर महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.