Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५, महापालिका निवडणूक अपडेट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अन् जागावाटप, महायुती, महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Ajit Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवार गैरहजर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवार गैरहजर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या नियमक मंडळाची बैठक सुरू

शरद पवार,हर्षवर्धन पाटील,विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू

पुण्यात महापालिकेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक असल्यामुळे अजित पवार गैरहजर राहणार असल्याची माहिती

वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शरद पवारांना अजित पवार एकत्र येणार होते

अजित पवारांच्या अनुस्थितीत बैठकीला सुरुवात

Kokan: कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी

नाताळची सुट्टी घालवण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्यने पर्यटक कोकणात दाखल झालेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरे-वारे गुहागर, दापोली, मुरुड, कर्दे, अशा सर्वच समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकणचा सागर किनारे गर्दीने फुलून गेलेत.

Pune: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

पुण्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रित लढणार

पुण्यात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

सचिन अहिर आणि सतेज पाटील घेणार एकत्रित पत्रकार परिषद

दुपारी एक वाजता दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद

महाविकास आघाडीची पुण्यातली पहिली यादी आज जाहीर होणार

तर पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला देखील सांगण्यात येणार

नागपुरात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या इच्छुकांकडून प्रचारास सुरुवात

- उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या इच्छुकांकडून प्रचारास सुरवात

- नागपुरातील प्रभाग 33 च्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून एकत्रित प्रचार

- पत्रकं घरोघरी वाटून केला जातोय प्रचार

- पत्रकावर प्रभाग 33 च्या काँग्रेसच्या 24 इच्छुक महिला-पुरुष उमेदवारांचे फोटो

- मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची शक्कल

- ''आम्ही काँग्रेस पक्षाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते असून येत्या निवडणुकीत इच्छुक आहोत"

- पत्रकात काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुक उमेद्वारांचेही फोटो

- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे दोन दिवस

- इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये वाढली धाकधूक

Nagpur: नागपूर महानगरपालिका निवडणुकीतही भाजप उमेदवारांना थेट AB फॉर्म देणार असल्याची माहिती

- बंडखोरी टाळण्यासाठी भाजप मोठ्या महानगरपालिकेत उमेदवारांची यादी जाहिर करण्याची शक्यता कमी

- निश्चित उमेदवारांना थेट एबी फॅार्म देण्याची शक्यता

- उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, अद्याप उमेदवारांची यादी जाहिर नाही

- बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची रणनीती

- सर्वच इच्छुक उमेदवार सध्या वेटिंगवर

- भाजपा शिवसेना युतीची चर्चाही अधांतरी

राखी जाधव भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. राखी जाधव या भाजपात प्रवेश करणार आहेत. त्या नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण मागील आठवड्यापासून वाढले आहे. राज्यातून तसेच राज्यातील पर्यटक सिंधुदुर्गसह गोव्यात येत असून महामार्गावरील अपूर्ण कामामुळे अपघात घडत आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कारला कुडाळ वेताळ बांबर्डे पुलाजवळ अपुर्ण कामामुळे अपघात झाला. येथील वळणाचा अंदाज न असल्याने कार चालकाचा ताबा सुटून कार गटारात जाऊन आदळली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही.

Jalgaon: जळगाव महापालिका निवडणूक जागावाटपाचे सूर जुळेना

भाजप व शिवसेनेच्या युतीचे ५०/२५ चे ठरल्यानंतर राष्ट्रवादीच्या सूत्र जागांवरून महायुतीत वादावादी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला कोणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजप ५०पेक्षा एकही जागा कमी घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या जागा घटणार हे निश्चित आहे. रविवारी दुपारी चर्चा फिस्कटल्यामुळे महायुतीत फाटाफूट होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा महायुती एकसंघ ठेवण्यासाठी रविवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले होते. रात्री उशिरापर्यंत महायुतीचा घोळात घोळ सुरू होता. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. सोमवारी व मंगळवारी इच्छुकांची प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे

कोल्हापूर महानगर पालिकेच्या काही जागांवरून भाजप - शिवसेनेत वाढला तणाव

दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने ही निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील काही जागांवरून महायुतीत गोंधळ कायम

भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये काही निवडक जागेचा वाद पोहोचला शिगेला

भाजप आणि शिवसेना आपापल्या मतांवर ठाम

वादग्रस्त जागांवर एकमत झालं नाही तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

काल झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये तिढा न सुटल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न

Bhandara: भंडाऱ्यात आज EVM विरोधात भाजप वगळता सर्पक्षीय मोर्चा

भंडाऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नावं गायब झाल्याच्या विरोधात भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे. भंडाऱ्याच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या करुणा राऊत यांचं नावं मतमोजणीच्या वेळेस ईव्हीएम मशीनमध्ये नसल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मतदान केंद्रावरील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याप्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा हा प्रकार भंडाऱ्यात घडला असल्यानं असाच प्रकार सर्व निवडणुकीतही झाला असावा, त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या या मागणीला घेऊन भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा भंडाऱ्यात काढण्यात येत आहे. या मोर्चात काँग्रेस नेते नाना पटोले, सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आणि नागरिक सहभागी होत आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा अपघात

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला. या कार मध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक असे तिघे गंभीर जखमी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. गंभीर जखमींना वाशीम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा अपघात घडल्याने याबद्दलची माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आली.

Nashik: नाशिकमध्ये अद्याप युती, आघाडीचा तिढा कायम

- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ दिवस उरलेला असतांनाही नाशकात अद्याप युती, आघाडीचा तिढा कायम

- युती, आघाडीबाबत कोणत्याच पक्षाकडून अधिकृत घोषणा नाही

- तर आजच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग

- भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

- मनसेतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले दिनकर पाटील, हिमगौरी आडके, मुकेश शहाणे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार

- तर शिंदेंच्या शिवसेनेकडून महानगरप्रमुख विलास शिंदे आणि राहुल दिवे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

- नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती जवळपास तुटल्याची सूत्रांची माहिती

- शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मात्र अद्याप चर्चा सुरू, आज युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Devgad: देवगड शहरात बिबट्याचे दर्शन

देवगड शहरातील तारामुंबरी मिठमुंबरी पुलाजवळ रात्रीच्या वेळी बिबट्या दिसून आला. या भागात बिबट्या फिरत असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. रविवारी रात्री मात्र बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. वनविभागाने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी मागणी सध्या होत आहे.

बियाणे तपासणी प्रणालीसाठी आमदारांची समिती स्थापन शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

- आमदार राजेश बकाने यांच्या मागणीला यश बोगस बियाण्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडला होता.

- बोगस उगवणक्षमते अभावी अपयशी बियाण्यांवर लगाम लागणार, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर उपाययोजना.

- दोषी कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाईचा अभ्यास – इतर राज्यांतील कडक पद्धतींचा आढावा.

- एका महिन्यात नवीन तपासणी प्रणाली तयार होणार शेतकऱ्यांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न.

- उच्चस्तरीय समिती गठीत कृषीमंत्री, राज्यमंत्री व विविध आमदारांचा समावेश.

Yavtmal: यवतमाळ पालिकेसाठी काँग्रेसची जुळवाजुळव

यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या यवतमाळ पालिकेवर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे अजूनही प्रयत्न सुरूच असून भाजप विरोधात मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. शिंदेसेना, प्रहार,एमआयएम,बसपा तसेच अपक्षांची संपर्क साधल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपने अपक्ष व प्रहार सोबत बोलणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Congress: काँग्रेसची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने १४ उमेदवारांची दुसरी यादी आज रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये माजी महापौर स्वाती येवलुजे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सुभाष बुचडे, माजी नगरसेविका पद्मावती पाटील यांनादेखील काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवले आहे. माजी नगरसेवक अजित पोवार (धामोडकर) यांच्या पत्नी रूपाली आणि माजी नगरसेवक हरिष चौगले यांचे पुत्र सचिन, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांचा मुलगा रोहित यांचाही यादीमध्ये समावेश आहे. यापूर्वी पक्षाने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, काँग्रेसने ६१ उमेदवार 'हात' या चिन्हावर उभे केले आहेत, तर राजू दिंडोर्ले यांना पुरस्कृत केले आहे. असे ६२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. खासदार शाहू महाराज, विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील, आमदार जयंत आसंगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी बनवली आहे.

Nagpur: नागपूर महानगर पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

* नागपुरात महाविकास आघाडीच ठरलं...

- आज घोषणा होण्याची शक्यता, मात्र नाव शेवटच्या दिवशीच जाहीर करणार

* नागपूर पालिकेच्या 151 जागांपैकी काँग्रेस 129 राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) 12 तर उद्धवसेनेला 10 जागा सोडण्याचा निर्णय

* तर काँग्रेसच्या तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार असल्याची माहिती..

- आज याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता..

* काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली बैठक

* या बैठकीला राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिये, शेखर सावरबांधे, उद्धवसेनेचे लोकसभा प्रमुख सतीश हरडे, जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, बंटी शेळके, सह ईतर नेत्यांची होती उपस्थिती...

Sangli: सांगली महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडीबाबत बैठका..

पुणे पाठोपाठ सांगलीतही महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या त्या दृष्टीने प्राथमिक बैठका देखील पार पडल्या आहेत.गेल्या दोन दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या आघाड्यांबाबत भाजप वगळता सर्व पक्षांच्या बैठका सांगली, मिरजेत पार पडत आहेत.तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट,शिवसेना शिंदे गट यांची मोट बांधून ही निवडणूक सामोरे जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिले आहेत.सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधात दोन्ही राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित येण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Pune: पुण्यात काँग्रेस शिवसेना मनसे सोबत लढवणार निवडणूक

काँग्रेस,शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्रित लढणार

आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते सतेज पाटील घोषणा करतील

जागावाटप अधिकृत घोषणा होणार

पुणे महानगरपालिकेत काँग्रेस 80 जागा लढवणार तर शिवसेना उबाठा आणि मनसे 65 जागा लढवणार आहेत व 15 ते 20 जागा मित्रपक्षासाठी सोडल्या जाणार

त्यामुळे आज यावर काँग्रेस शिवसेना उबाठा मनसेकडून अधिकृत घोषणा होईल...

Pune: पुणे महापालिकेत तिरंगी लढत होणार

पुणे महापालिकेत तिरंगी लढत होणार

भाजप आणि शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या सर्व मित्रपक्ष असे समीकरण असणार

आज अधिकृत सर्व पक्षांकडून घोषणा होण्याची शक्यता

शिवसेना आणि भाजपचा जागा वाटप तिढा अजून सुटला नाही मात्र आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

त्यामुळे पुण्यातील युती आणि आघाडी बाबत आज अंतिम निर्णय होईल

Sharad Pawar: शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्व साधारण सभेला दोन्ही नेते एकत्रित येणार

आज सकाळी ११ वाजता व्हि एस आय हडपसर मांजरी येथे कार्यक्रम

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा

साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमासाठी दोन्ही पवार एकत्रीत येणार

येणाऱ्या महानगपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतणे पुन्हा एकत्र येणार आहेत..

Solapur: सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने पहिली यादी केली जाहीर

सोलापूर -

सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाने पहिली यादी केली जाहीर

शिवसेना उबाठाने 11 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा लढावणार आहे 30 जागा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटा पाठोपाठ शिवसेना उबाठाने ही केली उमेदवारांची यादी जाहीर

शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी केली उमेदवार यादी जाहीर

Pune: पुण्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली, सचिन अहिर आणि सतेज पाटील यांच्यात बैठक

पुणे -

पुण्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली

पुण्यात सचिन अहिर आणि सतेज पाटील यांच्यात बैठक

जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये बैठक

पुण्यातील मनसेनेने सुद्धा घेणार सतेज पाटील आणि सचिन अहिर यांची भेट

पुणे महानगरपालिका निवडणुकीचे पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बैठका

काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा

सोमवारी तिन्ही पक्षांची होणार संयुक्त पत्रकार परिषद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

Paneer Bhurji Recipe : नाश्ता अन् जेवणासाठी झटपट बनवा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

Kendra Yog 2025: उद्यापासून या राशींच्या नशीबाची दारं उघडणार; न्याय देवता शनी बनवणार पॉवरफुल योग

SCROLL FOR NEXT