सांगली निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरंकडून सत्कार करण्यात आला आहे.मिरजेच्या प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव फारूख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादार यांच्यासह पॅनलचा विजय झाला आहे.या विजय उमेदवारांचा आमदार पडळकरांच्या हस्ते मिरजेत सत्कार पार पडला आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल 45 महिला नगरसेविका निवडून आल्याआहेत.तर 42 पुरुष नगरसेवक निवडून आल्याने पुरुषां पेक्षा महिलांचे संख्याबळ जास्त झाले आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेत आता महिलाराज आले आहे. 87 जागांपैकी 44 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 12 जागा आरक्षित होत्या.परंतु एकूण 45 जागांवर महिला निवडून आल्याने पुरुषांना 42 जागेवर समाधान मानावे लागले....
नवीन वर्षानिमित्त पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप च्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी स्वामी विवेकानंद सभागृहात एकाच वेळी 5 हंजार गजानन भक्तांनी महापारायनाचे वाचन केले, यावेळी शहरातील तरुण-तरुणी वृद्ध यांनी या महा पारायण वाचनामध्ये सहभाग घेतला होता यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पूजन करून या ठिकाणी भेट दिली
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार..
21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार..
या सामन्या करिता वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या दीड ते दोन दशकांपासून ओसाड पडलेल्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या सदनिकांना रात्री भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या सदनिकांनी अचानक पेट घेतला. मागील १५-२० वर्षांपासून वापराविना असलेल्या या इमारतींच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आणि मोठी झुडपे वाढली होती. यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वर्ध्यात रन फॉर इनव्हारमेंट 2026 चे आयोजन
4500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग
पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा दोन वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा
वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री रणजीत कांबळे, पोलीस अधीक्षकसह मान्यवरांची उपस्थिती
विजेत्यांसाठी विविध बक्षिस
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार..
21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार..
या सामन्या करिता वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...
धाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून,या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप कामाला लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप कार्यालयाकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.पंचायत समितीच्या ११० जागांसाठी सुमारे ३९२ इच्छुकांनी,तर जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी तब्बल ३२० असे एकूण ७१२ इच्छुकांनी इच्छुक अर्ज भाजपा कार्यालयात दाखल केले आहेत.पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक असले तरी उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिलीय.
महानगर पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसल्या नंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि चार आमदारांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली आहे.
भाजप नेते राज के. पुरोहित यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्यात पार पडलेल्या 29 नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाचा गौडबंगाल बाहेर आलं. अनेक ठिकाणी मतदारसंघ मतदारांचे वेळेवर बदलल्याने मतदान करण्याच्या दिवशी धांदल उडाली त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागला. मतदारांच्या बोटाला लावलेली शाही निघाली आणि अनेक ठिकाणी दुबार मतदारही झालं अशा अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्या. Vvpat नसल्याने मतदारांना त्यांचं मतदान कुणाला होतंय याची माहिती मिळाली नाही यासह अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहूमतसाठी 41 चा आकडं गाठणं महत्वाचं आहेय. त्यामुळे सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेय. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेयेत. पवित्रकार यांनी 'साम'शी बोलतांना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. 'ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है' म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेयेत. पवित्रकार हे भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहेय.
सन २०२४ च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणात, जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत, अशा मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याची भाषा वापरून गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे जलसा निमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांना क्रीडा मंडळ यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते, उद्घाटनाच्या वेळी खासदारांना कबड्डीचा मोह आवरलं नाही त्यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डीच्या आनंद घेतला आणि खेळाडूंच्या उत्साह वाढवला.
घरच्या वादातून खडकवासला धरणात खोल पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेचे प्राण येथील धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले. महिला पाण्यात बुडत असताना क्षणाचाही विलंब न करता हरिदास पुंडलिक वऱ्हाड यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व तिला बाहेर काढले. नंतर पोलिसांच्या मदतीने तिला पतीच्या स्वाधीन करण्यात आले. हरिदास यांच्या तत्परतेने प्राण वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा तालुक्यातून इच्छुक असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत निवडणूक तयारी,पक्ष संघटन बळकटी,बूथनिहाय नियोजन, उमेदवार निवड प्रक्रिया तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीत यश मिळवण्याचा संकल्प करण्यात आलाय.
सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ म्हणत आमदार सुभाष देशमुखावर निशाणा?
सोलापूर महापालिकेत जागा वाटपाच्या मुद्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते
दोघांनीही बंडाची भाषा देखील केली होती मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारात सहभागी देखील झाले
मात्र आमदार सुभाष देशमूख हे मात्र शेवटपर्यंत नाराज राहिले,प्रचारात आणि विजयी जल्लोशात देखील सहभागी झाले नाही
आज शहरात ठिकठिकाणी ‘’सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ या आशयचे बॅनर लागलेले पाहायला मिळतायत.
हिंगोलीत वाळू माफियांनी हौदोस घातला आहे, महसूल प्रशासन व पोलिसांच्या पथकाला पाहून भरधाव वेगात धावणाऱ्या डंपर चालकाने राज्य महामार्गावर डंपर हायड्रोलिक करत वाळू सांडून पळ काढला आहे रस्त्यावर वाळू पसरल्याने अनेक दुचाकी चालकांचे अपघात घडले आहेत दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्वतः स्थानिक नागरिकांना सोबत घेत रस्त्यावर सांडलेली ही वाळू बाजूला केली आहे हा सगळा गंभीर प्रकार हिंगोली औंढा मार्गावरील बोरजा फाटा येथे घडला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात वाळू माफिया किती सक्रिय आहेत हे देखील पुढे आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात मतांनी भाजपाचे पराभूत झालेले 14 उमेदवार यांचं योग्य सन्मान भाजपात केला जाईल तसेच त्यांची मन धरणी भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे
त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांना योग्य ती भाजपात सन्मान दिला जाईल अशी भूमिका संदीप नाईक यांनी व्यक्त केली
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे शिंदेंचे काही उमेदवार पडले असून तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे या ठिकाणी खासदार नरेश मस्के पराभूत झालेले उमेदवारांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांनी केला आहे योग्य वेळेला त्यांचा पुनर्वसन केला जाईल असे शब्द नरेश मस्केनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे .
हिंगोली जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दररोज आठ ते दहा रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे, लहान चिमुकले शाळकरी विद्यार्थिनी आणि जेष्ठ नागरिकांना हे भटके कुत्रे लक्ष करत आहेत दरम्यान हिंगोली पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर आता हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे ही भटकी कुत्री जमिनीवर बसलेली असताना अचानक हल्ला करत असल्याचे देखील पुढे आले आहे त्यामुळे रस्त्याने प्रवास करणारे नागरिक जीव मोठे धरून ये जा करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तसेच नवी मुंबई शहरामध्ये आता भाजपचा महापौर होत आहे त्यामुळे भाजपला नवी मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे या सर्व गोष्टीचा श्रेय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना जात आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांचा फोन करून अभिनंदन केला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.