Kairichi Dal Recipe : गरमागरम भात अन् आंबट-गोड कैरीची डाळ, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत

Shreya Maskar

कैरी

मार्च महिना सुरू झाला आहे. कैरीचा सीझन आला आहे. हिरव्यागार कैरीपासून मस्त आंबट-गोड कैरीची डाळ बनवा. रेसिपी आताच नोट करा.

Kairichi Dal | yandex

कैरीची डाळ

कैरीची डाळ बनवण्यासाठी हरभरा डाळ, कच्चा आंबा (कैरी), कढीपत्ता, धणे, लाल सुक्या मिरच्या, मिरची पावडर, तेल, हळद पावडर, हिंग आणि राई इत्यादी साहित्य लागते.

Kairichi Dal | yandex

डाळ

कैरीची डाळ बनवण्यासाठी हरभरा डाळ धुवून ४-५ तास भिजत ठेवा. आता भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. जास्त जाडसर पेस्ट करू नका.
Curry leaves

dal | yandex

कढीपत्ता

पॅनमध्ये तेल गरम करून यात मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून तडका बनवा. तुम्ही यात थोडे शेंगदाणे देखील टाकू शकता.

Curry leaves | yandex

मीठ

एका बाउलमध्ये बारीक केलेली हरभरा डाळ, कैरी, धणे, मीठ आणि मसाला घाला. तुम्ही यात किसलेली कैरी किंवा कैरीचे तुकडे देखील टाकू शकता.

Salt | yandex

कोथिंबीर

डाळीला चांगली उकळी आल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. त्यानंतर गरमागरम कैरीच्या डाळीचा भातासोबत आस्वाद घ्या.

Coriander | yandex

फायदे

कैरी खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते. कैरीमुळे हाडे मजबूत होतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयही निरोगी राहते. मधुमेहाचे रूग्णही ही डाळ खाऊ शकतात.

Kairichi Dal | yandex

उन्हाळ्यात आवर्जून प्या

उन्हाळ्यात कैरीची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पचनाचे त्रास होत नाही.

Kairichi Dal | yandex

NEXT : कैरीचा सीझन आलाय! ५ मिनिटांत बनवा कोकण स्पेशल आंबट, गोड कांदा-कैरीची चटणी

Kanda Kairi Chutney Recipe | saam tv
येथे क्लिक करा...