Shreya Maskar
मित्रांनो आता कैरीचा सीझन आला आहे. कैरी म्हटले की आंब्याची आठवण येते. कैरीचे अनेक पदार्थ कोकणात प्रसिद्ध आहे. त्यातील एक म्हणजे कांदा-कैरीची चटणी होय.
कांदा-कैरीची चटणी बनवण्यासाठी कैरी, कांदा, शेंगदाण्याचा कूट, गूळ, सैंधव मीठ, लाल तिखट, तेल, मोहरी, जिरे आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.
कांदा-कैरीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी सोलून मस्त किसून घ्या. दुसरीकडे कांदा सालून किसून घ्या. चटणी बनवण्यासाठी छोट्या कैरीचा वापर करा.
किसलेली कैरी आणि कांदा एकत्र करून एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये किसलेला गूळ, मीठ, तिखट आणि दाण्याचा कूट घाला. मिश्रणाला चांगले पाणी सुटू द्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग यांची फोडणी बनवा आणि तयार मिश्रणावर टाका. अशाप्रकारे आंबट, गोड कैरी-कांद्याची चटणी तयार झाली.
गरमागरम पोळी, चपाती, भात-वरण, पराठ्यासोबत कांदा-कैरीच्या चटणीचा आस्वाद घ्या. ही चवदार रेसिपी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल.
तयार चटणी हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवून द्या. कांदा-कैरीची चटणी २-३ दिवस फ्रिजमध्ये चांगली टिकते.
कैरी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते आणि पचन सुधारते. यात व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.