Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पनवेलच्या महापौरांच्या विनंतीनंतर प्रहार आणि अन्याय अत्याचार समितीचे ठिय्या आंदोलन स्थगित

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, राष्ट्रवादीची बैठक, रोहित पवारांची पत्रकार परिषद, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पनवेलच्या महापौरांच्या विनंतीनंतर प्रहार आणि अन्याय अत्याचार समितीचे ठिय्या आंदोलन स्थगित

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार जनशक्ती पक्ष,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवाशी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी पालिका आयुक्त यांना निवेदन देत नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली होती. परंतु पालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने पालिकेला ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला व आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन स्थळी नितीन पाटील, महापौर यांनी भेट देऊन आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करत सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. तसेच पालिका आयुक्त आणि प्रशासनानासोबत पुढील आठवड्यात गुरुवारी बैठक घेणार असल्याचे मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

महापौर यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नागरी प्रश्ना संदर्भात कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन प्रहार स्टाइल होईल, असा इशारा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी दिला.

बुलढाण्यातील गणपतीनगरमध्ये अस्वल बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत

बुलढाणा शहरातील गणपती नगर परिसरात अस्वल बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत...

वन्य प्राण्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कुंपण करण्याची मागणी...

बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला

गोंदिया येथील कथित बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला डॉक्टर नितेश बाजपेयी यांना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आज यावर सुनावणी झाली असून न्यायालयाने डॉक्टर बाजपेयी याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सध्या डॉक्टर बाजपेयी हा भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहे. दोन दिवसापूर्वी त्याने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या डॉक्टर बाजपेयीवर भंडाऱ्याच्या लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आता अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटल्यानंतर भंडारा पोलिसांनी लक्ष हॉस्पिटलला पत्र देत, आरोपी बाजपेयीची प्रकृतीत सुधारणा झाल्यावर, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी या पत्रातून केली आहे

ईडीची मुंबई आणि रायगडमध्ये मोठी कारवाई

ईडीची मुंबई आणि रायगड मध्ये मोठी कारवाई

:132.85 कोटींची मालमत्ता जप्त

* ईडीने मुंबई व रायगड जिल्ह्यातील 132.85 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली.

* कारवाई धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड प्रकरणात.

* एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक समूहाची सुमारे 1,438 कोटींच्या फसवणुकीची तक्रार.

* बनावट व्यापारी कागदपत्रांद्वारे कर्ज, एलसी आणि खरेदी कर्ज मिळवल्याचा आरोप.

Satara : साताऱ्यातील सालपे घाटात ट्रकला भीषण आग; आगीमध्ये ट्रकचे मोठे नुकसान

सातारा लोणंद मार्गावरील सालपे घाटात ट्रकला भीषण आग लागली. यामुळे तब्बल एक तास वाहतूक कोंडी रस्त्यावर पाहायला मिळाली.

Bhandara : बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला विचित्र अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात विचित्र अपघात घडला. भरधाव ट्रकने छोटा हत्तीला धडक देऊन पुढे उभ्या दुचाकी आणि हायवाला धडक दिली.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीपाला विक्रेत्याच्या संपूर्ण मालाचे नुकसान झाले तर छोटा हत्ती चालकासह अन्य दोघे जखमी झाले.

मुलुंड मेट्रो ब्रीज अपघात प्रकरणातले महत्वाचे २ आरोपी अजूनही फरार

मुलुंड पोलिसांचं विशेष पथक त्यांच्या शोधावर

वेल्डर उत्तरप्रेदशला पळून गेल्याचा संशय, दोन टीम शोधावर

आतापर्यंत पोलिसांकडून ५ जणांना अटक केली असून उद्या त्यांची पोलिस कोठडी संपणार आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका

पालकमंत्री एक नंबरचा बदामश, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडून शिकावं. पोटात शिरणारा शुक्राचार्य, असा उल्लेख भास्कर जाधव यांनी केलाय. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये खोटं भाषण केलं, असं भास्कर जाधव म्हणालेत.

वेळेवर वेतन द्या, नांदेड पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

नांदेड महापालिकेच्या सफाई कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यासाठी आज कामबंद केले. तसेच महापालिलेवर मोर्चा काढला. पालिकेकडून कोणत्याच महिन्यात वेळेवर वेतन दिलं जातं नाही. या महिन्यात सतरा तारीख आली तरी वेतन मिळालं नाही. पालिका प्रशासनाने कुठलिही नोटीस न देता शंभरहून.अधिक कामगारांना कामावरून काढले.

पुण्यात टिपू सुलतान झिंदाबादच्या घोषणा, मास मूव्हमेंट संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

भाजपच्या कार्यालयाजवळ मास मूवमेंट संघटनेची घोषणाबाजी

अचानक केलेल्या घोषणाबाजीमुळ गोंधळ

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दिले सोडून

टिपू सुलतान चा फोटो घेऊन भाजप कार्यालय जवळ घोषणाबाजी

तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही दिल्या घोषणा

नाशिक जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला

- पेठ तालुक्यात जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला

- हल्ल्यात महिलेच्या डोक्यासह मानेवर आणि चेहऱ्यावर जखमा

- जखमी महिलेवर पेठ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार

- पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू

- घटनेची माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल

- उपचारासाठी शासकीय मदतीची घोषणा

- बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची तयारी

- सततच्या हल्ल्यांमुळे नाशिकच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

नवी मुंबईमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना जबर मारहाण

तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरवली मधील ॲमेझॉन कोल्ड स्टार वेअर हाऊस वर काम करणाऱ्या तिघांना कचरा टाकण्याच्या वादातून जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी मिळून काठी,खुर्च्या,पट्ट्याने जबर मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ हाती लागला असून घटनेची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून यातील शोएब शेख आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र व्हिडीओमध्ये दोनपेक्षा खूपच जास्त व्यक्ती मारहाण करताना दिसत आहेत.मात्र नक्की कचऱ्यावरून इतके टोकाचे भांडण झाले का,की इतक्या जणांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केला,याबाबत कोणताही खुलासा नाही.मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील ऋषिकेश वावेकर याच्या डोक्यावर चाकूने वार झाला असून केतन गोंधळी आणि राहुल माळी यांनाही जबर दुखापत झाली आहे.आता पोलिस याबाबत आणखी काय कारवाई करत आहेत हे पाहणे महत्वाचे असेल

मुलींना खाऊ देण्यासाठी निघालेल्या पित्याचा भीषण अपघातात मृत्यू

एकीकडे आपल्या लाडक्या मुलींना भेटण्याची ओढ आणि दुसरीकडे काळाने दबा धरून बसलेला मृत्यू...धुळे-सुरत महामार्गावर एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुलींसाठी खाऊ घेऊन जाणाऱ्या वडिलांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीजवळील बंधारपाड्याचे मनेष गावीत हे आपल्या पत्नीसह मुलींना भेटायला जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या घटनेमुळे तीन मुलींच्या डोक्यावरचं छत्र हरपलं असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या सापाची सुटका करून सर्पमित्राने दिले जीवदान

कल्याणमध्ये रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या काळ्या चटयाबत्याच्या सापाला सर्पमित्राने शिताफीने बाटलीतून सुटका करत त्या सापाला जीवदान दिले आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील वाडेघर परिसरातील रोनक सिटी मधील शंकर मंदिरासमोर घडली आहे. या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिले

नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकींचा अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

- या भीषण धडकेत १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर (रा. काचीपुरा) असे मृतकाच नाव आहे... हे दोघे कबड्डीपटू असल्याची माहिती .

- उशिरा रात्री भरधाव दुचाकीने सिग्नल जंप करत सुसाट चालवत होते.... यावेळी दुचाकीचा वेग जीवघेणा ठरला....

- वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून स्टंटबाजी करताना जीवावर बेतले...

- विष्णूजी की रसोईसमोर एका महिला दुचाकीस्वाराला कट मारताना बुलेट चालकांचा ताबा सुटला.... त्यानंतर दुचाकी थेट रस्त्याचाकडेला असलेल्या पिलरवर जाऊन आदळली...

- नागरिकांनी त्यांना तातडीने रामदासपेठेतील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

- पुढील तपास बजाज नगर पोलीस करत आहेत

अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण

अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून नागरिकांनी एका 35 ते 40 वर्षीय युवकाला बेदम मारहाण केली...

यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्या युवकाला नागरिकांच्या ताब्यातून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले...

लहान मुलांना पळवणारी टोळी शहरात सक्रिय असल्याची अफवा अमरावतीत जोराने सुरू असून अशी कोणतीही टोळी सक्रिय नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.. असे आवाहन अमरावती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केला आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच काम रोखण्याचा प्रयत्न

पालघरच्या शिगाव येथे शेतकरी आक्रमक . भूसंपादनासह घरांचा मोबदला न दिल्याने शेतकरी आक्रमक . शिगाव सह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात . मोबदला दिल्याशिवाय काम करू देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा .

आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमीप्रती केली दिलगिरी व्यक्त

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केली या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या होत्या तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते या अनुषंगाने काही वेळापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत "भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमी प्रति दिलगिरी व्यक्त करतो व कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचण्याचा माझा हेतू नव्हता" अशा प्रकारची फेसबुक पोस्ट केली आहे.

Sangli: सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कायम

सांगली -

सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कायम

सांगली महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

शहारातील झुलेलाल चौक ते शंभर फुटी रोडवरील अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून जेसीबी लावून काढण्यात आले आहे.

यावेळी नागरिकांनी अतिक्रमणाला विरोध देखील केला ज्यामुळे प्रशासन अधिकारी आणि नागरिकांच्या मध्ये वादावादीचा प्रकार देखील यावेळी घडला.

Thane: मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यातही मेट्रो अपघात होण्याची शक्यता

ठाणे -

मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यातही मेट्रो अपघात होण्याची शक्यता

ठाणे गायमुख ते नितीन जंक्शन मार्गावर सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामकाजा दरम्यान अनेक ठिकाणी मेट्रोच्या पिलरला खालूनच गेले आहेत तडे

तर काही पिलर हे बाहेर उचकलेल्या अवस्थेत देखील येत आहेत दिसून

Latur: शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध, अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर -

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध

अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्याचा प्रयत्न. परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी लातूरच्या भोकरंबा येथे कडाडून विरोध केला आहे

मोजणीसाठी महसूल अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा आल्याने शेतकरी संतप्त झाले

या मोजणीला विरोध करण्यासाठी एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये शाब्दिक बचाबाची देखील झाली आहे. दबावतंत्र वापरून मोजणी केली जात असल्याचा शेतकरी आरोप करत आहेत.

Ajit Pawar Death: ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईल - सुरेश धस

बीड-

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी ब्लॅक बॉक्स चा रिपोर्ट समोर आल्यानंतर सगळं काही समोर येईल असं म्हणत ज्यांना काही शंका आहेत.

त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही मात्र हा अपघात अपघातच आहे असं म्हटलं.

अपघातानंतर ज्यांनी लगेचच शंका व्यक्त केल्या होत्या त्यानंतर रात्री पवार साहेबांनी देखील समोर येऊन अपघातच असल्याचे सांगितलेले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली.

Beed: महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आणखी तिघांची होणार नार्को टेस्ट

बीड -

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट

या हत्याप्रकरणी तेजस मोरे, सोमनाथ जाधव, महेश शिंदे या संशितांची होणार नार्को टेस्ट

सहा लोकांच्या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग पेस्ट करण्यासाठी परवानगी मिळाली

तिघांची पूर्वीच ब्रेन बॅटिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली आहे

उर्वरित तिघांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग उद्या होणार आहे

नागपूर शहरात UGC विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला

- विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. हातात फलक, घोषणाबाजी आणि मोर्चा शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत अखेर संविधान चौक येथे येऊन समाप्त झाला.

- यावेळी वक्त्यांनी UGC विधेयकामुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत नागरिकांनी मांडले.

महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पाच्या घळ भरणी कामाला ग्रामस्थांचा विरोध

महाड तालुक्यातील कोथेरी धरणावर सुरु असलेल्या घळभरणी कामाला येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी विरोध करीत घळभरणीचे काम बंद पाडले आहे. कोथेरी धरण हा सिंचन प्रकल्प असून लाभक्षेत्रातील फायदे आणि शंभर टक्के पुर्नवसन झाल्यानंतरच घळभरणीचे काम करा अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. पत्र व्यवहार करून देखील लघू पाटबंधारे विभागाने घळ भरणीचे काम सुरू केले. धरणाच्या भिंतीचे घळभरणीचे काम पुर्ण झाले की धरणात पाणी साचेल आणि नंतर मागण्या मान्य होणार नाहीत अशी प्रकल्पग्रस्तांना भिती आहे. धरणाला विरोध नाही मात्र मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी घेतला आहे.

जळगावच्या धरणगाव येथे चोपडा रोडवरील एमआयडीसी मधील भंगार गोडाऊनला भीषण आग

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती ; आकाशात धुराचे लोट व आगीचे लोळ उसळल्याने परिसरात पसरले भीतीचे वातावरण

शेजारीच महावितरणचे 132 केव्हीचे सब स्टेशन मात्र आग तिथपर्यंत न पोहोचल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

धरणगाव, अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे

सोन्याचे दर 3 हजार रुपयांनी तर चांदीचे दर देखील 3 हजार रुपयांनी घसरले

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 49 हजार 260 रुपयांवर आले आहेत

गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

कल्याणमध्ये बांगलादेशी बेकायदेशीर वास्तव्याच्या आरोपांवरून भाजप आक्रमक,खडकपाडा पोलीस ठाणे येथे निवेदन

कल्याण पश्चिमेतील काही उच्चभ्रू परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित व्यक्ती चिकन-मटण विक्री, फेरीवाला तसेच घरेलू कामगार म्हणून कार्यरत असल्याचा दावा करत भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी खडकपाडा पोलीस ठाणे येथे जाऊन निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तींची कागदपत्रे सखोल तपासावीत व बेकायदेशीर वास्तव्य आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील विविध गृहनिर्माण सोसायट्यांची बैठक घेऊन घरेलू कामगारांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

चंद्रभागा शुध्दीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींची लूट;

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागा शुद्धीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रभागा नदीतील पाणी शुद्ध व स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेबर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

मात्र ही टेक्नॉलॉजी पूर्णता फेल गेल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही यंत्रणा जागच्या जागी उभी असल्याने नदी शुद्धीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग पूर्णता फसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रयोगासाठी राज्य शासनाने 21 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात गेले आहेत.

Maharashtra Live News Update: संयम पाळतोय म्हणून... औलाद समजू नका, अजित पवार विमान अपघाताच्या बाबत रूपाली ठोंबरे आक्रमक

अजित दादांच्या निधनाला आज २१ दिवस होऊन गेले. संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारतोय की पुरावे समोर कधी येणार? आम्ही संयम धरला होता, समाजातील वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही भूमिका घेतली होती पण सत्य समोर नसेल येणार तर काय संयम सुटला जाऊ शकतो. संयम सोडायला लावू नका, आम्ही... औलादी नाहीत, अशी आक्रमक भूमिका रूपाली ठोंबरे यांनी आज व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी आमची सुद्धा एक टीम तयार केली आहे असे त्या म्हणाल्या.

अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अहिल्यानगर मध्ये दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. टिपू सुलतान याची तुलना शिवाजी महाराजाशी केल्याने सपकाळ राज्यात अनेक ठिकाणी निषेध नोंदविण्यात येतं असून आज अहिल्यानगर मध्ये त्यांच्या आणि टिपू सुलतानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी लोकांच्या डोक्यात इस्लामीकरण घालण्याकरिता हा प्रयत्न करण्यात येतं असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला असून हे महाराष्ट्रात सहन केल जाणार नसल्याची प्रतिक्रिया जगताप यांनी दिली आहे.

सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती बिघडली

सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

यवतमाळ जिल्ह्यात जिओचा नेटवर्क ठप्प

जिओ टेलिकॉम नेटवर्कच्या महाराष्ट्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम सांभाळणाऱ्या प्रताप टेक्नोक्रेट्स प्रा. लि. कंपनी विरोधात 16 जिल्ह्यांतील 400 ते 500 कामगारांनी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील सावना येथे संप पुकारला आहे. या संपाचा फटका थेट जिओच्या नेटवर्क सेवेला बसला असून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी आणि आर्णी या तालुक्यांतील काही भागांत जिओची रेंज उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कॉल लागणे, इंटरनेट सेवा खंडित होणे अशा समस्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा कामगारांनी घेतलाय.

अमरावती आणि बडनेरा शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

अमरावती आणि बडनेरा शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद....

काल रात्री पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्या दरम्यान असलेली मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा राहणार बंद...

महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू

जीटी एक्सप्रेसला भीषण आग

वर्धा–तुळजापूर रेल्वे मार्गावर सिंधी जीटी एक्सप्रेसच्या मधोमध असलेल्या डब्याला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात

वणी येथे भीषण अपघात ; तिघे गंभीर जखमी..

कळवण - नाशिक रस्त्यावर हॉटेल गारवेल समोर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक…

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान…

स्थानिकांच्या मदतीने जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात केले दाखल ; उपचार सुरू…

वणी पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू

हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक

सकल हिंदू समाजाचा आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन

हर्षवर्धन संकपाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून करणार निषेध

हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याशी केली होती तुलना

रायगड किल्ल्यावर रोप वे सेवा 6 दिवस बंद राहणार

रायगड किल्ल्यावर ये जा करण्यासाठीची रोप वे सेवा या आठवड्यात 6 दिवस बंद राहणार आहे. वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोप वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत रोप वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. पर्यटक आणि शिवप्रेमींची या दरम्यान गैरसोय होणार आहे. या बद्दल व्यवस्थापनाकडून दिलगिरी व्यक्त करीत रोप वे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आल आहे.

पुण्यात पोलिस भरती प्रक्रिया थांबवणार

पोलिस भरती सुरू असताना बीडचा एक तरुण शारीरिक चाचणी दरम्यान मृत्युमुखी पडला

त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दुपारी ११.३० ते ४ पोलिस भरती प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-कोकण रो-रो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार

मुंबई-कोकण रो-रो सेवा आता एप्रिलमध्ये सुरू होणार

हा प्रवास पाच तासांत पूर्ण होणार

एप्रिलमध्ये मुंबई विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात उघड्या विद्युत रोहित्राला चिकटून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच घटनेत दोशींवर कारवाई करण्याची मागणी करत दीड तास महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Kalva Traffic: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कळव्यात मोठी वाहतूक कोंडी...

जुन्या मुंबई बेलापूर रोडवरील कळवा येथे टेम्पो डिवाइडरला धडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.. झाली होती आता वाहतूक तुरळक सुरू झाली आहे.

जुना बेलापूर रोड येथील कळवा येथून पनवेल ठाणे च्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर रात्री साधारण तीन च्या दरम्यान अपघात झाल्याने वाहतुकीमध्ये झाला मोठा अडथळा..

रात्री साधारण पहाटे तीन वाजता हा अपघात झाला असून वाहतूक विभागाने अपघातग्रस्त वाहनाला पाच तासानंतर बाजूला केल्याने मोठी वाहतूक कोंडी सदरच्या मार्गावर झाली आहे..

Nanded: नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या पाच जागेसाठी भाजपाकडे 80 अर्ज दाखल

नांदेड महापालिकेत एकूण 81 नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे 45 नगरसेवक निवडून आल्यानंतर 5 जणांना संधी मिळणार आहे. काँग्रेसचे 14, एमआयएमचे 5 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडे तब्बल 80 अर्ज दाखल झाले असून या मध्ये डॉक्टर वकील इंजिनिअर चार्टड अकाउंट संस्थाचालक अशा विविध क्षेत्रांतील इच्छुक शर्यतीत उतरले आहेत. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपमध्ये या निवडीवरून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधून भाजपा प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आले आहेत तर काही भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आहेत आता या निवडीत कोणाला नगरसेवक पद द्यायचं हा प्रश्न भाजपाच्या पक्षश्रेष्ठी समोर आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला नगरसेवक पद देऊ नये अशी मागणी सुद्धा भाजपातील निष्ठावंत करत आहेत . स्वीकृत नगरसेवकपद मिळवण्यासाठी अनेकांनी मुंबई पर्यंत फिल्डिंग लावल्याची माहिती आहे

Buldhana: हृदयद्रावक! खडकपूर्णा कालव्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू..

बुलढाणा जिल्ह्याच्या आंचरवाडी येथील खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .. कोलोरा येथील रहिवासी असलेला आणि आई वडिलांचे छत्र हरविलेला स्वराज गणेश खरात हा 11 वर्षीय विद्यार्थी अंचरवाडी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये ५ वीत शिक्षण घेत होता.. तो त्याच हायकुल शेजारी असलेल्या शासकीय वसतिगृहात राहत होता.. स्वराज आपल्या मित्रांसोबत दुपारी खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेला असता तीन विद्यार्थ्यांनी कालव्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या.. यातील दोघांना पोहणे येत असल्याने ते पोहत कालव्याच्या पायऱ्यांनी वर आले.. मात्र स्वराजला पोहणे नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला.. यावेळी परिसरातील महिल्यांनी आरडा-ओरड केली असता काही लोक मदतीसाठी धावले, मात्र स्वराज पाणी खोल असल्याने सापडला नाही .. ग्रामस्थानी बराच वेळ शोधून ही स्वराज आढळून न आल्याने प्रशासनाने ndrf पथकाला पाचारण केले, शेवटी स्वराज चा मृत अवस्थेत आढळून आला .. दरम्यान मृतक स्वराज चे नातेवाईक यांनी वसतिगृह प्रशासनाच्या हलगर्जीपण मुळे मृत्य झाल्याचा आरोप करत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केलीय ..

Hingoli: हिंगोलीत शेतकऱ्यांना दिलासा! मिळाले गव्हाचे चांगले उत्पादन

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसाचा फायदा रब्बी हंगामातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे, जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची शाश्वती असल्याने मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड केली होती योग्य वेळी पाण्याचा गव्हाला पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले असून मागील पाच वर्षात पहिल्यांदाच एकरी शेतकऱ्यांना आठ ते दहा क्विंटल गव्हाचा उतारा येण्याची शक्यता गहू उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान बाजारपेठेत देखील सध्या गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होणार आहे.

भुसावळ येथे नुपूर शास्त्रीय महोत्सवाचे आयोजन

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नुपूर शास्त्रीय महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील शास्त्रीय नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला होता. कथ्थक कुचीपुडी, मोहिनीअट्टम , ओडिसी, मणिपुरी, कथकली,भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांनी भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील रामा कौंडूल्य यांना नृत्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Kolhapur:कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवक साठी आज होणार अर्ज दाखल, भाजप शिवसेनेचे नावे निश्चित

नगरसेवकांसाठी भाजप, शिवसेनेची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत; पण काँग्रेसमधील तीन सदस्यांच्या नावांसाठी आज सकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांमधील इच्छुकांनी नाव निश्चित करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. आज सकाळी अकरा ते दोन वेळेत महापालिकेत अर्ज दाखल करायचे आहेत. सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार असली तरी त्यात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज द्यावे लागणार आहेत. त्यांची सात शर्तीनुसार छाननी झाल्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. यासाठी भाजपकडून तसेच कॉंग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून अनेक इच्छुक आहेत. त्यासाठी भाजपने सव्वा वर्षाचा मार्ग काढला. त्यानुसार पाच वर्षांत बारा स्वीकृत नगरसेवक करणार आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांना पुढील टप्प्यात नगरसेवक करण्याचा शब्द देत नेत्यांनी आपली मान सोडवून घेतली आहे. त्यातून स्वीकृत करण्याचा दबाव थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज प्रशासनाकडे अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी त्यांची छाननी केली जाणार आहे.

Jalgaon: सावदा शहरातील पाणीपुरवठा 3 ते 4 दिवस राहणार बंद

जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे नगरपरिषदेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पाण्याच्या टाकीचे वॉटरप्रूफिंग सह पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार आहे, दुरुस्तीच्या कामामुळे सावदा शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद राहणार असून त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Pune: पुणे शहर पोलीस भरतीला सुरुवात

पुणे शहर पोलीस भरतीसाठी १.८५ लाख अर्ज

आरएफआयडी-सीसीटीव्हीच्या निगरानीत भरतीला सुरुवात

पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी

या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक आणि ३३ पोलिस बँड कर्मचारी अशा एकूण १६३३ पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या १३० पदांचा समावेश

मैदानी व शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार

शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश

या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक

भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी 'आरएफआयडी' तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली घेण्यात येणार

Mumbai: मुंबईत ईडीची मोठी कारवाई; ५.८८ कोटींच्या ७ मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई झोनल कार्यालयाने एनडीपीएस प्रकरणात मोठी कारवाई करत सुमारे ५.८८ कोटी रुपये किमतीच्या सात स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. फैसल शेख, अल्फिया शेख आणि इतरांविरुद्ध पीएमएलए २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबी मुंबईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात फैसल शेख हा बंदी असलेल्या मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थाची खरेदी करून त्याचे जाळे तयार केल्याचे उघड झाले. फैसल व त्याची पत्नी अल्फिया शेख यांनी एमडी विक्रीतून मिळालेला पैसा बँक खात्यांद्वारे फिरवून तो कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला. यासाठी बनावट कंपन्या व सहकाऱ्यांच्या खात्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Solapur: सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती

सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती

स्वीकृत नगरसेवक निवडताना एक जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची राजकीय चाल

सोलापूर महापालिका निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे सत्तेत सहभागी

सोलापुरात भाजपाचे 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकच उमेदवार निवडून आला आहे

संख्या बळानुसार भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत मात्र जर शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्यास भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होऊ शकतो

हीच बाब लक्षात घेत भाजपचे राजकीय चाल खेळत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांना सत्तेत सहभागी करून घेतलंय

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम यांचे आज दुःखद निधन झाले. आज सिल्लोड येथे अंत्यविधी होणार आहे. नफिसाबेगम सत्तार या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. नगराध्यक्षा म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.

Yavatmal:  यवतमाळमध्ये पुसद येथे नऊ किलो गांजा जप्त

यवतमाळच्या पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाच्या घरातून नऊ किलो 260 गांजा सह एक लाख 85 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पुसद ग्रामीण पोलिसांनी केलीये.अर्जुन बरगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pune: पुणे महापालिकेला आयोगाकडे रखडलेले तब्बल ३०७ कोटींचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

पुणे महापालिकेला १५ व्या वित्त आयोगाकडे रखडलेले तब्बल ३०७ कोटींची अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

महापालिका निवडणुकीत नवी पालिका अस्तित्वात आल्याने मार्ग मोकळा

केंद्राकडून २०२०-२१ ते २०२५-२६ काळासाठी महापालिकेला ८२४ कोटींचे अनुदान मंजूर झाले होते

मात्र, २०२२ पासून लोकनियुक्त सदस्य नसल्याचे कारण देत आतापर्यंत महापालिकेस केवळ ५१७ कोटींची अनुदान देण्यात आले

नवीन सभागृह अस्तित्वात आल्याने हे अनुदान महापालिकेला मिळण्यातील अडचण दूर झाली आहे

महापालिकेला मंजूर झालेला निधी मिळावा, यासाठी महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न देखील सुरु होते

Amravati: अमरावतीच्या पंचवटी ते कांता नगर भागात मोठी पाईपलाइन फुटली

अमरावतीच्या पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला होता रात्री जलमय, मोठी पाईपलाईन फुटली

पीडीएमसी मुलींच्या वस्तीगृह समोरील रस्त्यावर झाले होते पाणीच पाणी

सोमवारी रात्री उशिराची घटना, वस्तीगृहातील विध्यार्थीनीत भीतीचे वातावरण

दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने लांब अंतरा पर्यत पाणी

पीडीएमसी रुग्णालय परिसरात शिरले होते पाणी रस्त्यावर पाणी पाहून निर्माण झाली होती तलाव सदृश्य परिस्थिती

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमतानं निवड

अजित पवार राष्ट्रवादीच्या रत्नागिरी जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमतानं निवड

अजय बिरवटकर हे अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेव्हणे

अजय बिरवटकर हे खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून आले जिंकून

रत्नागिरी जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादीचे 5 सदस्यांचा विजय

खेड दापोली आणि चिपळूण मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार लढली होती स्वतंत्र निवडणूक

राज्यात तीन पक्ष एकत्र असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये सत्तेत सहभागी व्हायचं का याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल

गटनेता म्हणून निवड झाली पण आमचा विजयाचं श्रेय अजित पवार यांना समर्पित

Nashik: नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील अंतरिम अर्जावर आज मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात ही याचिका दाखल केलीय. या प्रकरणात नाशिक महापालिका तसच नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आज सुनावणीदरम्यान नाशिक महापालिका आणि संबंधित विभाग न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश NSUI कडून पुण्यात मोदींच्या विरोधात आंदोलन

एपस्टीन फाईल्स मध्ये मोदींचे नाव आल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश NSUI चे आंदोलन

संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील कलाकार कट्टा येथे आंदोलन

Parth Pawar: पार्थ पवार यांना अभय, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याचा अहवाल सादर

पार्थ पवार यांना अभय, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याचा अहवाल सादर

पार्थ पवार यांच्या विरोधात काहीही कारवाई होणार नसल्याने त्यांचा राज्यसभेवर निवडून येण्याचा मार्ग झाला मोकळा

पार्थ हे अमेडिया कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढव्याच्या जमीन खरेदीत थेट संबंध येत नाही, परिणामी चौकशी समितीने पार्थ पवार यांना अभय दिले आहे

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस

जमीन प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल

अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील महार वतनाची जमीन खरेदी केली होती. बाजारभावाप्रमाणे १८०० रुपये किमतीची जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाला होता

तसेच या व्यवहारात २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच टीका झाली होती

यामुळे पार्थ यांच्या कंपनीचा हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती

मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो. अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही

तसेच या व्यवहारात अमेडिया कंपनीला मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस

Pune: पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा

पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा

महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा'च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला

शिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले

तसेच आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा पार पडली.

महापौर मंजुषा नागपुरे, मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि गणेश बिडकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते

ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गर्दुल्ल्यांचा खुले आम नशेचा खेळ

ठाणे कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये गरदुले खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मधला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडिओ मुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचेच पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात धुमाकूळ घालणारे हे गर्दुल्ले आता थेट लोकलच्या डब्यातच नशा करत असल्याचे दिसून आल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे

Shirur-शिरूर-राजगुरुनगर रोडवर भीषण अपघात; दुचाकीवरील पाचजण गंभीर जखमी!

कार आणि दुचाकीच्या या भिषण अपघात दुचाकीवरील दोन महिला, दोन लहान मुले आणि एक पुरुष असे पाचही जण गंभीर जखमी झालेत.भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेनंतर दुचाकी वरुन प्रवास करणारे पाचही जण रस्त्यावर फेकले गेले, अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे

Khed : विहिरीत बुडून १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कैवल्य एकनाथ भोते असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या वडील आणि भावासोबत पोहण्यासाठी गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र खोल पाण्यामुळे शोध घेणे कठीण झाले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवघ्या दहा मिनिटांत कैवल्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.या घटनेमुळे घोटवडी परिसरात शोककळा पसरली असून भोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुलढाण्यात भीषण अपघात.. पिकअप व बुलेटची टक्कर; एक ठार, चार विद्यार्थी जखमी

बुलढाणा–देऊळघाट मार्गावर निवांत हॉटेलजवळ सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेल्या इको पिकअप आणि बुलेट दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात बुलेटस्वार मोहम्मद तौसिफ यांचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टक्कर इतकी जबरदस्त होती की पिकअप वाहन दोनदा पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे....

Maharashtra Live News Update: बेपर्वा ब्रिजकामाचा कहर! मुंबईत लोखंडी पिलर थेट कारवर कोसळला

मुंबईतील विकासकामांची खरी परिस्थिती पुन्हा उघड मुलुंड-गोरेगाव लिंक रोड येथे सुरू असलेल्या ब्रिजकामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

SCROLL FOR NEXT