Monsoon Tourism Saam Tv
महाराष्ट्र

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या ५ गोष्टींची काळजी घ्या

पावसाळ्यात फिरायला जाताय मग ही बातमी वाचाच.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पावसाळा (Rain) सुरू झाला की, पावसाळ्यातील पर्यटनाला बहर येतो. धुक्यात हरवलेले गडकिल्ले, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची झुंबड उडते. मात्र अति उत्साहाच्या नादात कधी कधी हेच पावसाळी पर्यटन अगदी जिवावरही बेतत असते. त्यामुळे तुम्हीही पावसाळी पर्यटनासाठी जात असाल, तर सावधगिरी बाळगा. पावसाळ्याचे काय कोणत्याही ऋतूत पर्यटनासाठी जाताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण पाहुया.

धो- धो कोसळणारा पाऊस, सोबतीला सुंदर आणि नयनरम्य निसर्ग, मनाला मोहवून टाकणारे धुके अशा वातावरणात कुणालाही पर्यटनाचा मोह सोडवणार नाही. सध्या तर स्मार्ट फोनमुळे गडकिल्ले, धबधबे अशा ठिकाणी जावून सेल्फी, फोटो, व्हिडिओ, रिल्स तयार करण्याची अनेकांची चढाओढ सुरू असते. त्यामुळे अनेकदा अतिउत्साह अनेकांच्या जीवावर बेततो आणि क्षणात सर्व काही संपते. मात्र तुम्हाला सुरक्षित राहून पावसाचा, निसर्गाचा, गड किल्ल्यांचा, धबधब्यांचा निखळ आनंद लुटायचा असेल, तर काळजी घ्यायला हवी.

पर्यटनाला जाताना काय काळजी घ्याल

१. सर्वात आधी जिथे तुम्ही पर्यटनासाठी जाणार आहात, त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती करून घ्यायला पाहिजे.

२. पावसाळ्यात पहिल्यांदाच एखाद्या पर्यटनस्थळी जाणार असाल तर ट्रेकर्सच्या अनुभवी आणि वरिष्ठ गृपसोबत जायला हवे. जिथे फिरायला जात आहात, त्या ठिकाणच्या गावातील एक व्यक्ती सोबत घ्यायला हवा. कारण पावसाळ्यात अनेकदा नेहमीच्या वाटाही धोकादायक बनतात, त्यामुळे माहितीतील व्यक्ती सोबत असायला हवा. तर तो तुम्हाला दुसऱ्या सुरक्षित वाटेने बाहेर काढू शकतो.

३. सर्वात महत्वाचे म्हणजे एखादी दुर्घटना अथवा आपत्ती आलीच तर गावातील स्थानिक व्यक्ती सोबत असल्याने तुम्हाला तातडीने गावकऱ्यांची मदत मिळू शकते.

४. अनेकदा पाऊस सुरू झाला, की धबधबे प्रवाहित होतात. मात्र लगेचच अशा धबधब्यांच्याखाली जाणे टाळा. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला धबधबे प्रवाहित झाले, की उंच डोंगरावरून खाली कोसळणाऱ्या पाण्यासोबत डोंगरावरील दगड, धोंडे ज्याला लूज रॉक देखील म्हणतात, ते वाहून खाली येत असतात.

५.गड किल्ल्यांवरही पावसामुळे वाटा निसरड्या झालेल्या असतात, डोंगराचा एखादा भाग खचण्याची भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनस्थळी फिरायला जाताना ही काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT