रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा वाद ताजा असतानाच दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात चक्क 94 हजार विद्यार्थी नापास झालेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालातून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची मातृभाषेतच दांडी गुल झाल्याने तीव्र प्रतिक्रीया उमटतायेत. या निकालातून महाराष्ट्रातच मराठी भाषेची परिस्थिती फारशी सुखावह नसल्याचं अधोरेखित झालंय.
मराठी भाषा विषयाचा निकाल 92.57 टक्के लागला आहे. जवळपास 8 टक्के विद्यार्थी मातृभाषेतच नापास झाले आहेत.
मराठी प्रथम भाषा म्हणून परीक्षा देणारे विद्यार्थी -
10 लाख 87 हजार 699
नापास विद्यार्थी - 80 हजार 803
मराठी द्वितीय आणि तृतीय भाषा निवडून परीक्षा देणारे विद्यार्थी -
4 लाख 13 हजार 913
नापास विद्यार्थी - 13 हजार 741
मराठी भाषेत एकूण नापास विद्यार्थ्यांची संख्या -
94 हजार 544
मराठी विषयाची अनास्था कोणामुळे होते? अभिजात भाषेचा दर्जा फक्त सोशल मीडियावर आणि कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. या निकालावर पालकांनी नाराजी व्यक्त केलीय. या निकालावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी परखड मत व्यक्त केलंय. मराठी शिक्षकांचे मराठी बद्दल खरंच प्रेम आहे का? मराठी भाषेचे मारेकरी कोण आहेत? या प्रश्नाची उत्तरं पुढे आली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय.
अमराठींना मराठी शिकवण्याचा आग्रह धरत असताना मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांचीच मराठीतली परवड चिंताजनक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्याची पद्धत आणि शिकवणाऱ्यांची क्षमता तपासण्याची गरज आहे. यादृष्टीनं शिक्षण खात्यानं लक्ष द्यायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.