Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

JNU: गो बॅक,गो बॅक! देवेंद्र फडणवीसांविरोधात दिल्लीत जेएनयूमध्ये SFI विद्यार्थ्यांच्या जोरदार घोषणा

SFI Protest In Jawaharlal Nehru: महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या जन-सुरक्षा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जेएनयूमध्ये एसएफआयनं आंदोलन केलं. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.

Bharat Jadhav

दिल्लीत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जेएनयूमध्ये आंदोलन करण्यात आलं. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आहे. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गो बॅक अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांनिमित्त दिल्लीत गेले आहेत. जेएनयूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. त्याच ठिकाणी फडणवीस यांच्याविरोधात एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फडणवीस, एकनाथ शिंदे गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या.

जेएनयुमध्ये मराठी अध्ययन केंद्राचे उद्धाटन करण्यात येत आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. राज्यात आणण्यात आलेल्या जन सुरक्षा कायद्यावरून एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आंदोलन केले. संघाचा प्रपोगंडा चालणार नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनी फडणवीसांविरोधात आंदोलन केलं. महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिमांवर हल्ले होत आहेत.त्यात तेथील सरकारने जन सुरक्षा बिल आणल्यानं जातीयवादाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे, त्याचा आम्ही विरोध करत असल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थीने दिलीय.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिरस्कार पसरवताय. त्यांच्या राजकारणामुळे तिरस्कार पसरतोय. त्यामुळे आम्ही निदर्शनं करत आहोत. जेएनयूसारख्या जागेत अशा लोकांना स्थान नाही. तिरस्कार पसरवणाऱ्या, समाजात विष कालवणाऱ्या लोकांना जेएनयूमध्ये स्थान नाही. असं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

कपडे बघून लोकांना ओळखा असं देवेंद्र फडणवीस सांगत असतील, भाजपचे लोक सांगत असतील हिंदी भाषा लादणार असतील तर आम्ही का गप्पा बसायचं? आम्हाला येथे मराठी अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत काही म्हणणं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते उद्घाटन होतं आहे त्यावर आमचा आक्षेप आहे, असे जेएनयूमधील काही मराठी विद्यार्थ्य्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

SCROLL FOR NEXT