CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Marathi language: मोठा निर्णय! सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; राज्य सरकारचे निर्देश

Gangappa Pujari

वैदेही कानेकर, मुंबई|ता. १४ सप्टेंबर

Maharashtra Government GR: राज्यातील खासगी तसेच सरकारी शाळेतील अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा असे निर्देश राज्य सरकारने दिले असून मराठी भाषा सक्तीकडे महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबताचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे. या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केले जाणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठी भाषा सक्तीच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय खाजगी तसेच सरकारी शाळेत सक्तीचा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबताचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे. या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केले जाणार आहे.

या निर्णयानुसार, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २०२० पासून करण्यात येत आहे. वरील अधिनियमाची सन २०२०-२१ पासून टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तथापि, कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नव्हत्या.

त्यामुळे राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२२-२३ च्या आठवीची बॅच २०२३-२४ ला नववी मध्ये व २०२४-२५ ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतचा निर्णय दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.. 2025- 2026 या शैक्षणिक वर्षापासून होणार या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Century: चेन्नईत लोकल बॉयची हवा... R Ashwin ने झळकावले खणखणीत शतक अन् जड्डूसोबत विक्रमी भागीदारी

Hingoli Accident : भीषण अपघात..अनियंत्रित ट्रक पलटी होऊन ८५ शेळ्या ठार; अकोला- हैदराबाद महामार्गावरील दुर्घटना

Nandurbar News : लाडक्या बहीणींचा बँकेबाहेर मुक्काम; Video

Perfect Life Partner: परफेक्ट लाईफ पार्टनर होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण पाहिजेत?

Maharashtra News Live Updates: आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT