Marathi Bhasha 
महाराष्ट्र

VIDEO : मला मराठी येत नाही, हिंदी भारताची भाषा नाही का? परप्रांतीयाची पुन्हा हुज्जत, व्हिडीओ व्हायरल

Marathi Bhasha : कल्याणमधील मराठीवरून वाद झाल्याची घटना ताजी असतानाच आता पेणमधील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पेणमध्ये परप्रांतीय महिलाने थेट मराठी माणसालाच सवाल उपस्थित केलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Marathi Bhasha News : कल्याणमध्ये परप्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यानं मराठी कटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पेणमधील एक व्हिडीओ समोर आलेय. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेनं थेट मराठी माणसालाच भाषेवर सवाल उपस्थित केलाय. तुम्‍ही काशी, बनारसला जाता मग आम्‍ही हिंदी बोललं तर काय बिघडतं, असा सवाल हिंदी भाषक महिलेनं मराठी भाषकांना विचारलाय. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्‍यावरून वादाचा हा व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आलाय.

मुंबई आणि कल्‍याणमधील मराठी भाषक आणि हिंदी भाष‍क यांच्‍यातील वाद राज्यात चर्चेत आहे. त्यातच पेण शहरातील एक व्हिडिओ समोर आलाय. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्‍या चांगलाच व्‍हायरल झालाय. यात मराठी बोलण्‍यावरून परप्रांतीय भाजी विक्रेती महिला मराठी भाषक ग्राहकांशी हुज्‍जत घालत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी-हिंदी वाद चव्हाट्यावर आलाय.

त्‍या महिलेच्‍या फोनवर सुरू असलेल्‍या संभाषणावरून ग्राहक तिला मराठीत बोलायला सांगत आहेत. मात्र आपल्‍याला मराठी येत नाही तुम्‍ही हिंदी बोला असं ती ग्राहकांना सांगते. यासंर्भात तिने पेण पोलीस ठाण्‍यात फोन करून याबाबत तक्रार करत आहे. काशी, बनारसला अंघोळ करायला जाता ना मग आम्‍ही हिंदी बोललं तर काय बिघडते. हिंदी भारताची भाषा नाही का? असा सवाल या हिंदी भाषक महिलेने उपस्थित केल्‍याचे या व्हिडिओतून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT