Priya Berde Gautami Patil Saamtv
महाराष्ट्र

Priya Berde On Gautami Patil: 'तमाशा चवीने बघणारे लोक आहेत, तोपर्यंत...' गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर प्रिया बेर्डेंनी साधला निशाणा

Gautami Patil News: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाष्य केलं आहे.

Gangappa Pujari

Priya Berde On Gautami Patil: लावणी कलावंत (Lavani Dancer) गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना सध्या तुफान गर्दी होत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी, हुल्लडबाजीच्याही अनेक घटना समोर येत असतात. मात्र एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असतानाच, गौतमीमुळे लावणीची बदनामी होत असल्याची टीकाही वारंवार होत आहे.

आजच लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी लोककलेची गौतमी पाटील करू नका असे म्हणत निशाणा साधला होता. त्यापाठोपाठ आता गौतमी पाटीलच्या नाचाविषयी अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या प्रिया बेर्डे...

अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) आज कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये (Sangali) आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चर्चेदरम्यान पत्रकारांनी त्यांना गौतमी पाटील यांच्या विषयी विचारलं असता परखड मत व्यक्त केले आहे. "या सगळ्या गोष्टींना बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत," असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

"आम्ही कलाकारांनी किंवा राज्यकर्त्यांनी ओरडून कितीही निषेध केला तरी काही उपयोग होणार नाही. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

इंदुरीकर महाराजांनीही केली होती टीका...

दरम्यान, गौतमी पाटीलवर काही दिवसांपूर्वी निवृत्ती महाराज इंदुरीकरांनीही निशाणा साधला होता. किर्तनादरम्यान बोलताना त्यांनी तीन गाण्यांचे तीन लाख रुपये घेता आणि आम्ही पाच हजार मागितले तरी, पैशाचा बाजार मांडला म्हणता, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT