Ashadhi Wari 2023: आषाढी वारी सोहळा! जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख ठरली

Ashadhi Wari Sohala: 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saamtv

Ashadhi Wari 2023: आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील (Pandharpur) विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे.

यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची (Sant Tukaram Maharaj) पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.

Ashadhi Wari 2023
Eknath Shinde Criticize Opposition: विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये, त्यांना काय करावं सुचत नाहीये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज (sant Tukaram Maharaj) पालखी प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम देहू देवस्थान संस्थानकडून आज जाहिर करण्यात आला आहे. येत्या १० जून रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे श्रीक्षेत्र देहुगाव येथून पंढरपुरकड़े प्रस्थान ठेवनार आहे. तर, 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Ashadhi Wari 2023
Ajit Pawar News : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका; अजित पवार संतापले, नेमकं काय घडलं?

दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे ,माणिक महाराज मोरे, आदीं उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली होती. तसेच हे काम लवकरात लवकर पुर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com