Marathwada Unseasonal Rain Saam Tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात 17 बळी; 15 हजार शेतकरी बाधित, 26 तासांपेक्षा अधिक काळ बत्तीगुल

Chhatrapati Sambhajinagar Unseasonal Rain : मराठवाड्यात 9 ते 21 एप्रिल दरम्यान विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात (Marathawada Unseasonal Rain) एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तब्बल 853 गावांना फटका बसला आहे. यामुळे येथील 15 हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली आहे. शिवाय वीज पडून तब्बल 17 जणांचा मृत्यू आणि 32 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्तालयाच्या वतीने व्यक्त (Marathawada Unseasonal Rain) करण्यात आला आहे.

मराठवाड्यात 9 ते 21 एप्रिल या तेरा दिवसात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात अनेक तालुक्यांमध्ये गारपिट झाली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालं, तर 602 घरांची पडझड (Marathawada Rain) झाली. शिवाय लहान-मोठी 280 जनावरे देखील दगावली (Farmers Affected) आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी सुमारे 20 मिनिट झालेल्या वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने (Unseasonal Rain) शहरातील नागरिकांसह महावितरणालाही चांगलाच घाम फोडला (Chhatrapati Sambhajinagar Unseasonal Rain) आहे. शहरातील अनेक भागात विद्युत खांब आणि तारा तुटल्या आहेत. यामुळे महावितरणला सुमारे 1 कोटी 70 लाखांचे नुकसान सहन करावा लागले.  9 एप्रिलपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक माणसे आणि जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

या अवकाळी पावसामुळे महावितरणाची चांगलीच दानादान उडाली (Crop Destroyed) आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे पितळ 20 मिनिटात उघडे पडले आहे. त्यामुळे पूर्ण शहर अंधारात बुडाल्याने महावितरण बरोबरच नागरिकांनाही घामाघुम व्हावे लागले. दरम्यान यामुळे शहरातील 27 पैकी 13 सबस्टेशन बंद आहे. गारखेडा, पुंडलिकनगर यासारख्या काही भागांत 26 तासापेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित (Power Supply Interrupted) झाला होता. पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यातील 481 गावांतील 450 घरांचे नुकसान झाल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT