Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

राजधानीत मराठा, उपराजधानीत ओबीसी....आरक्षणावरून महाराष्ट्र तापला, फडणवीस सरकार खिंडीत

महाराष्ट्रात मराठा व ओबीसी आरक्षणाच्या संघर्षामुळे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मुंबईत चक्काजाम, नागपूरमध्ये उपोषण आहे. राज्यातील फडणवीस सरकार खिंडीत अडकले आहे. आता फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Namdeo Kumbhar

  • मुंबईत मराठा समाजाने आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन केले.

  • नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आरक्षण वाचवण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले.

  • मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे वादळ उभे राहिले आहे.

  • फडणवीस सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणावरून महाराष्ट्रातील फडणवीस सरकार खिंडत अडकले आहे. मुंबईमध्ये मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून चक्काजाम केलेय, तर दुसरीकडे आमच्यातील आरक्षण कुणालाही देऊ नये, त्यासाठी ओबीसीने उपराजधानी नागपूरमध्ये साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये धडकले आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये ओबीसी समाजानेही आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून उपोषण सुरू केले. त्यामुळे फडणवीस सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी आजपासून आम्ही आंदोलन करत आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली. विनोद तावडे हे आज अमित शाह यांना भेटून 50 टक्के घातलेली मर्यादा शिथिल करून मराठ्यांना आरक्षण देता असेल तर आम्हाला त्याचा विरोध नाही, आम्ही आमच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मागू.. नाहीतर लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी, असे तायवडे म्हणाले.

त्यासोबत तहसीलदार वंशावळ जुळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यांचाकडे नोंदी आहेत, त्यांना देण्यास हरकत नाही. आम्ही आजपासून साखळी उपोषण सुरू करत आहे, गरज पडल्यास आम्ही मुंबईला जाण्यासाठी तयारी करू, असेही बबनराव तायवाडे म्हणालेत. आज नागपुरात साखळी उपोषण सुरू होत आहे, टप्प्या टप्प्याने इतर जिल्ह्यात आम्ही आंदोलन करू असेही बबनराव तायवाडे म्हणालेत.

फुके काय म्हणाले ?

जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे, ओबीसी समाजात असंतोष आहे. संविधान चौकात साखळी उपोषणाची सुरवात होत आहे. सरकार ओबीसींचा पाठीशी आहे, घाबरण्याची गरज नाही. नवीन जात यात समाविष्ट होणार नाही... आज जाऊन भेट देणार आहे. ओबीसी समाजाने आंदोलन पुकारले, असंतोषाचे वातावरण पुकारले, मागील वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आश्वासन दिले की ओबीसीला धक्का लागणार नाही, असे फुके म्हणाले.

सरकार प्रश्न कसा सोडवेल

मराठ्यांना आरक्षण देण्याचे काम फडणवीस सरकारने केलेय. उद्धव ठाकरे सरकार आल्यावर ते कोर्टात आरक्षण टिकवू शकले नाही.. 2022 मध्ये EWS मध्ये आरक्षण देण्याचं काम केलं.. यात अनेक योजना राबवण्यात आल्यात. मराठा समाजाच्या युवकांसाठी न्याय देण्याचं का फडणवीस सरकारने केले. 20 टक्के समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्याचा फायदा मराठा समाजाने घ्यावा, असे फुके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

Crime: भयंकर! अंघोळ करणाऱ्या बायकोवर चाकूने सपासप वार, जीव घेतल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह केलं अन्...

Maharashtra Live News Update: धाराशिवात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT